Friday, May 20, 2022
Homeपाचोरापाचोरा रेल्वे समस्यांचे कॉंग्रेस चे रेल्वे मंत्र्याकडे साकडे

पाचोरा रेल्वे समस्यांचे कॉंग्रेस चे रेल्वे मंत्र्याकडे साकडे

पाचोरा रेल्वे समस्यांचे कॉंग्रेस चे रेल्वे मंत्र्याकडे साकडे

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा जंक्शन स्टेशन वर सुपरफास्ट गाड्यांना थांबा सह पीजे रेल्वे सुरू करण्याच्या मागणीसह विविध समस्यांचे रेल्वे केंद्रीय राज्यमंत्रीना निवेदन पाचोरा कॉंग्रेस कडुन देण्यात आले

पाचोरा हे जंक्शन स्टेशन असुन येथुन रेल्वे प्रशासनाला मालधक्का चे उत्पन्न भरपूर आहे मात्र रेल्वे च्या प्रमुख गाड्या सह इतर समस्यांसाठी रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे यांना कॉंग्रेस चे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले यावेळी अल्पसंख्यक जिल्हा सचिव इरफान मनियार, अमजद मौलाना, रवी पाथरवट उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की पाचोरा जंक्शन असुन पाचोरा ते जामनेर पीजे ही दोन तालुक्यातील जिव्हाळा निर्माण करणारी गाडी कोरोना च्या नावाखाली बंद केली ती तातडीने सुरू करावे तसेच पाचोरा सह सोयगाव, पारोळा, भडगाव, एरंडोल, जामनेर तालुक्यातील जनतेला येजा करावे लागते त्यामुळे विदर्भ एक्सप्रेस, अमरावती मुंबई एक्सप्रेस, आझाद हिंद एक्सप्रेस, बॅग्लोर अहमदाबाद एक्सप्रेस, ओकाया रामेश्वर एक्सप्रेस, जबलपुर मुंबई गरीब रथ, पंजाब मेल यांना थांबा देण्यात यावा यासह भुसावळ-मुंबई पॅसेंजर, भुसावळ देवलाली शटल सुरू करुन अप-डाउन करणार्‍यांना तात्काळ मासिक व त्रमासिक पास द्यावी यासह बनोटी ते पाचोरा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे यासाठी संबंधित विभागांना शिफारस करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. कॉंग्रेस ने केंद्रीय राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे यांना बनोटी येथे दौरा असतांना हे निवेदन देण्यात आल्याने ना. दानवे यांनी कॉंग्रेस पदाधिकारींचे कौतुक केले

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments