Friday, May 20, 2022
Homeवडजी विदयालयात प्रजासत्ताक दिन साजरा :
Array

वडजी विदयालयात प्रजासत्ताक दिन साजरा :

वडजी विदयालयात प्रजासत्ताक दिन साजरा :
भडगाव : प्रतिनिधी – भडगाव तालुक्यातील वडजी येथील टी .आर . पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविदयालयात दि .२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहन विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक श्री .ई .एम . पाटील यांचे हस्ते करण्यात आले . ३१ मे २०२२ रोजी ते सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांना ध्वजारोहनाचा मान देण्यात आला . ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत आणि ध्वजगीत घेऊन , घोषणा देऊन , जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे आणि कोरोना नियमांचे पालन करून प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला .
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य ए .एस .पाटील ,स्कूल कमिटीचे चेअरमन कैलास रामदास पाटील , सदस्य भिकन अभिमन पाटील , एकनाथ धुडकू गायकवाड , बी .वाय . पाटील , पोलीस पाटील कैलास मोरे यांचे सह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते .

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments