जळगाव पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या नवचैतन्य अभियान या 15 दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन जळगाव पोलिसांसाठी आयोजित करण्यात आले होते .
या कार्यक्रमाची सांगता करतेवेळी डॉ.प्रविण मुंडे यांनी या 15 दिवसीय कोर्से मध्ये लाभलेल्या वक्ते मंडळींचे आभार मानले आणि तसेच त्यांना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.यात डॉ.भूषण मगर फौंडेशन पाचोरा यांच्या वतीने सन्मान स्वीकारण्यासाठी वक्ते अनिलचंद्र सुर्वे उपस्थित होते,या प्रसंगी बोलताना डॉ.मुंडे म्हणाले की,स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवा,जीवनशैली चांगली ठेवा,शरीराची काळजी घ्या, त्याचबरोबर कुटुंबाची देखील काळजी घ्या आणि नियमित व्यायाम करा. या नवचैतन्य अभियानामुळे पोलिसांसाठी एक नवचैतन्य निमार्ण होहून दररोजच्या मानसिक तणावापासून काही प्रमाणात का होईना पोलीसानाचा ताण कमी झाल्याचे यावेळी पोलीस बांधवांनी बोलून दाखविले .