आ.कुणाल पाटील रात्री साडे दहा वाजता
विकास कामांची पाहणी करतात तेव्हा
प्रतिनिधी- सतिष पवार
संपर्क – ९५२७७९९३०४
धुळे ग्रामीण विधानसभा
धुळे- रात्रीचे साडे दहा वाजलेत…दिवसभराची उदघाटने, कामे आटोपून घराकडे परतीचा प्रवास सुरु होता… आमदार कुणाल पाटील यांच्या मनात मात्र वेगळाच विचार सुरू होता… त्यांनी आपल्या वाहनाचा ताफा थेट भदाणे ते खंडलाय दरम्यान सुरू असलेल्या नवीन पुलाच्या कामावर नेला…आणि सुरू झाली कामाची पाहणी… विकास कामांची ही तळमळ साऱ्यांनाच सुखावून गेली.
विकासाचा ध्यास आणि मतदारसंघासाठी अहोरात्र काम करण्याचे जिद्द माणसाला शांत बसू देत नाही. काम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असली कि दिवस काय आणि रात्र काय, शाश्वत आणि उत्तम दर्जाच्या विकासासाठी आ. कुणाल पाटील यांनी मतदार संघातील भदाणे ते खंडलाय दरम्यान सुरू असलेल्या छोट्या पुलाच्या कामाची तब्बल रात्री 10.30 वा. भेट पाहणी केली. त्यामुळे आपला लोकप्रतिनिधी मतदार संघासाठी रात्री उशिरापर्यंत झटत असल्याचे पाहून ग्रामस्थांनी समाधान व कौतुक केले.
निवासस्थानी दुपारी भेटीसाठी व आपल्या कामांसाठी आलेल्या अभ्यगतांची कैफियत, समस्या ऐकून घेत त्यांचा निपटारा केला, आणि धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचा नियोजित दौरा मतदार संघातील विविध विकास कामांच्या उद्घाटन व भूमिपूजनासाठी सुरू झाला. दत्तजयंतीचा मुहूर्त साधून आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते दि.18 डिसेंबर रोजी धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातील सैताळे, शिरधाणे, बांबुर्ले, खंडलाय या गावातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भूमिपूजन, उद्घाटनाच्या कार्यक्रमाबरोबरच गावातील प्रश्न जाणून घेत आमदार कुणाल पाटील यांनी या कार्यक्रमादरम्यान गावकऱ्यांशी चर्चाही केली. त्यानंतर आ. कुणाल पाटील यांनी भदाणे ते खंडलाय दरम्यान सुरू असलेल्या लहान पुलाच्या कामाला भेट दिली व पहाणी केली. रात्रीचे साडे दहा वाजले होते, आपल्याच प्रयत्नाने मंजूर झालेली कामे उत्तम दर्जाची व्हावीत आणि मतदार संघातील जनतेची गैरसोय दूर व्हावी म्हणून अविश्रांतपणे काम करीत आ. कुणाल पाटील यांनी या कामाची माहिती जाणून घेतली. यावेळी सैताळे गावाजवळील लहान पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी सोबत असलेले उपअभियंता संजय देवरे,उपअभियंता किरण पाटील, मिलिंद मुडावदकर यांच्याकडून सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली. आणि पुलाचे बांधकाम उत्तम दर्जाचे व्हावे अशा सूचनाही दिल्या. यावेळी आ. कुणाल पाटील यांच्यासोबत माजी पं. सं. सभापती भगवान गर्दे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डाॅ. दरबारसिंग गिरासे, माजी जि. प. सदस्य साहेबराव खैरनार, माजी प.स. सदस्य योगेश पाटील, नेर जि.प. सदस्य आनंदभाऊ पाटील,महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष गायत्री जयस्वाल, ग्रामविस्तार अधिकारी भास्कर सोनवणे, माजी सरपंच सोमनाथ पाटील, उपसरपंच हिरामण पाटील, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे,गटनेते आबा पगारे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. सकाळपासून तर रात्री उशिरापर्यंत मतदार संघातील जनतेमध्ये जाऊन विकासासाठी झटणारे आपले लोकप्रतिनिधी पाहून आमदार कुणाल पाटील यांच्याप्रती ग्रामस्थांनी समाधान व कौतुक केले.