शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे सावद्यातील व्यक्ति विशेष हाजी शेख हारुन यांना डॉक्टरेट पदवी घोषित
“जळगांव – जिल्ह्यातच नव्हे व इतरांना हेवा वाटेल अशी आधुनिकतेची कास धरून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात क्रांतीच्या श्रेणीत येणारे कार्य म्हणजे सावदा सारख्या लहान गावांमध्ये गोरगरिबांच्या मुलांसाठी भव्य दिव्य सुंदर अद्ययावत इमारत स्वतःच्या खर्चाने शून्यातून भरारी घेणारे हाजी शेख हारून शेख इक्बाल यांनी डायमंड इंग्लिश मेडीयम शाळा उभारलेली असून शहरात अतिउत्तम दर्जाचे शैक्षणिक काम (हब) देखील निर्माण करण्यासाठी त्यांनी पाऊल टाकलेले आहे.”
रावेर तालुका प्रतिनिधी दिलीप चांदेलकर सावदा
सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील व्यक्तिमत्व एक अशी की, शेख हारून शेख इक्बाल हे व्यवसायानिमित्त त्यात अग्रेसर असताना तसेच त्यांची सामाजिक व कौटुंबिक परिस्थिती जनसामान्य सारखे असल्यावर त्यांनी आपल्याला गोरगरीब जनतेचे व समाजाचे काहीतरी देणे लागत असून या परिस्थितीतून एक उंच भरभराटीची गरुड झेप घेऊन सामाजिक स्तरावर त्यांनी कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता हाजी इक्बाल हुसेन मल्टीपर्पस फाउंडेशन द्वारा संचालित डायमंड इंग्लिश मिडीयम शाळा यामध्ये शैक्षणिक दर्जा उंचावण्यास करिता प्राचार्य शिक्षक कर्मचारी रुंद यांची सचोटीने परीक्षा घेऊन त्यांची नियुक्ती देखील केलेली आहे. अशाप्रकारे इवलेशे रोप लावून त्या रोपाचे वटवृक्षात रूपांतर करणारे या फाऊंडेशनचे सचिव व डायमंड इंग्लिश मीडियम शाळेचे चेअरमन हाजी हारून शेख हे व्यक्तिमत्व म्हणजे सचोटीचे व्यक्तिमत्व होय.
तसेच डायमंड इंग्लिश मीडियम शाळेच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब जनतेच्या आर्थिक परिस्थितीनुसारजेवढी होईल तेवढी शक्यतो मदत शिक्षण क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात वैद्यकीय क्षेत्रात इत्यादी लोकांच्या समस्या सोडविण्याकरिता ते नेहमी अग्रेसर असून त्यांच्याकडे सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या आशाचे किरण म्हणून बघितले जाते. म्हणूनच परिसरातील जनतेच्या त्यांच्यावर एवढा विश्वास आहे की, सामाजिक कौटुंबिक तंटे वाद-विवाद सोडवण्यास ते नेहमी अग्रसर राहत असतात व वाद आपसात मिटवण्याची भूमिका नेहमी घेत असतात.
महाराष्ट्रात केलेल्या सर्वेनुसार हाजी शेख हारून शेख इक्बाल यांच्या सदरील कामगिरीची दखल घेऊन कॉमन-वेल्थ ओकेशनल युनिव्हर्सिटी किंग्डम ऑफ टोंगा दिल्ली यांच्या माध्यमातून त्यांना देशाच्या राजधानी असलेल्या दिल्ली येथे दी.१८/१२/२०२१ रोजी डॉक्टरेट (पीएचडी) पदवी ने सन्मानित करण्यात येणार असून त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे मानेतुरा लाभलेला आहे. सावदा सह सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.केळी व ट्रान्सपोर्ट व्यवसाय निमित्त सावदा शहराचे नाव दिल्लीपर्यंत आधीच पोहोचलेले आहेत.मात्र शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्याची दखल घेऊन सावदा येथील हाजी हारुन शेख इक्बाल यांना मिळालेल्या डॉक्टरेट पदवी मुळे देखील सावदा शहराचे नाव पुन्हा दिल्लीला लैकीक यावरून झाले आहे.