Home पाचोरा मुंबईपावसानेही घेतली रविवारची सुट्टी पावसानेही घेतली रविवारची सुट्टी !

मुंबईपावसानेही घेतली रविवारची सुट्टी पावसानेही घेतली रविवारची सुट्टी !

मुंबई : रविवारी सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने विश्रांती घेतली असली तरी रविवारच्या सकाळच्या साडेआठच्या नोंदीनुसार मुंबईत ४१.३ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे रविवारी सकाळपासून मुंबईत थांबून थांबून पाऊस पडत असला तरी येत्या २४ तासांसाठी उत्तर कोकणाला हवामान खात्याने दिलेला मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे.


भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८, ९ आणि १० जुलै रोजी कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ८ जुलै रोजी मुंबई शहर आणि उपनगरात अधूनमधून मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील. रविवारी सकाळपासूनच मुंबईत पाऊस विश्रांतीवर होता. कुठे तरी पडलेली मोठी सर वगळता दुपारी २ वाजेपर्यंत मुंबई रोजच्या पावसाच्या मानाने कोरडीच होती. मुंबईत ८ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला, ३७ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. ५९ ठिकाणी झाडे कोसळली, सुदैवाने यामध्ये कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही.