Friday, May 20, 2022
Homeशुभांगीताई पाटील यांनी नवनिर्वाचित शिक्षण उप-संचालक चव्हाण यांची घेतली भेट
Array

शुभांगीताई पाटील यांनी नवनिर्वाचित शिक्षण उप-संचालक चव्हाण यांची घेतली भेट

शुभांगी ताई पाटील यांनी नवनिर्वाचित शिक्षण उप-संचालक मा चव्हाण यांची घेतली भेट
पहिल्याच भेटीत नाशिक विभागातील समस्यांबाबत केले अवगत

नाशिक दि १३ डिसेंबर – (प्रतिनिधी) – महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष मा शुभांगीताई पाटील यांनी आज नाशिक विभागाचे नवनिर्वाचित शिक्षण उप-संचालक श्रीयुत चव्हाण यांची भेट घेत त्यांना नाशिक विभागातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व संस्थाचालक यांच्या समस्यांबाबत अवगत केले. या मध्ये सर्वप्रथम


विभागातील अघोषित,प्राथमिक,माध्यमिक,व उच्च माध्यमिक शाळा व नैसर्गिक वाढीच्या वर्ग व तुकड्या यांच्या त्रूटी पूर्ततेसाठी व हरकती बाबत सुनावणी दि 9 डिसेंबर रोजी पुणे येथे मा संचालक कार्यालयात कॅम्प चे आयोजन केले होते या कॅम्पला विभागातून असंख्य शिक्षक ,कर्मचारी व संस्था चालक यांच्या सोबत मी स्वतः उपस्थित होते.परंतु त्यादिवशी आपल्या कार्यालयाकडून व धुळे वगळता जिल्हा पातळीवरून देखिल कोणीही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे सदर सुनावणी ही उद्या दि 14/12/2021रोजी ठेवण्यात आली आहे.त्यामुळे उध्या तरी संबंधित जिल्ह्यांचे अधिकारी यांच्यासह शिक्षण उप-संचालक कार्यालयातून जबाबदार अधिकाऱ्यांना पुणे संचालक कार्यालयात उपस्थित ठेवण्याची मागणीकेली.
तसेच 100%अनुदानित, व अंशतः अनुदान तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांचे प्रलंबित विवीध बिले ज्या मध्ये पी एफ, मेडिकल बिले,पेन्शन बिले इ साठी आवश्यक असलेला बि डी एस उपलब्धकरून द्यावी अशी मागणी मेली
तसेच शिक्षकांच्या शालार्थ आई डी व सेवा सातत्य चे प्रलंबित प्रकरणे तात्काळ मंजूरकरण्या ची मागणी केली त्याचबरोबर शिक्षकांच्या व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली व प्रश मार्गी लावले

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments