Friday, May 20, 2022
Homeपाचोराडॉ भूषण मगर यांना वैद्यकीय क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर

डॉ भूषण मगर यांना वैद्यकीय क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर

डॉ भूषण मगर यांना वैद्यकीय क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर

सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद व माणुसकी रुग्णसेवा समुह शासकीय रुग्णालय घाटी, औरंगाबाद* यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या वर्धापन दिनानिमित्त वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉ भूषण मगर यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.हा पुरस्कार सोहळा दि. ३०-१२-२०२१ गुरुवार रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा मौलाना आझाद संशोधन केंद्र, टीव्ही सेंटर औरंगाबाद येथे संपन्न होणार आहे.
माणुसकी चा पाचवा वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा- सकाळी १०:०० वाजता महारक्तदान शिबीर शासकीय रत्त पेढि साठि- ०१:०० वा. मान्यवरांच्या हस्ते सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३१ व्यक्तीचां गुण गौरव या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्यापैकी एक जळगाव जिल्ह्यातील नामवंत डॉ.भूषण मगर यांना वैद्यकीय सेवेतील सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाला असून ते विघ्नहर्ता मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल पाचोरा संचालक, डॉ भूषण दादा मगर फाउंडेशन पाचोरा संस्थापक,भोलेनाथ हॉस्पिटल पारोळा संचालक* यांच्या माध्यमातून समाजातील गरीब-गरजू, रुग्णासाठी व्यासपीठ तयार करून सहकारी व मित्र परिवार सोबत घेवून रुग्णसेवक म्हणून सेवा करत असतात. त्यांना शासकीय सन्मान- तहसीलदार व उपविभागीय दंडाधिकारी, विविध सामाजिक संस्था तर्फे तसेच एबीपी माझा तर्फे जनसेवेसाठी विशेष सन्मानित करन्यात आले आहे. त्यांनी कोरोनाच्या च्या काळात आपले खाजगी कोविड सेंटर शासनाला समर्पित कडून महाराष्ट्रातले पहिले कोविड सेंटर ठरले होते. रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे, खेडोपाडी जाऊन मोफत आरोग्य सेवा देणे, पाचोरा भडगाव तालुक्यातील तरुणांना नोकरी भरती चे मेळावे भरवणे,अशी अनेक कार्य प्रशासन व नागरीक यांचे समन्वयक म्हणून सदैव जनसेवा ते करीत असतात. सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असतात अशा या महान कर्तुत्ववान देवमाणूस डॉ.भूषण मगर सरांना माणुसकी समुहाचा सेवा गौरव पुरस्कारासाठी निवड झाल्या बाबत पत्राद्वारे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित यांनी कळविले आहे.ह्या पुरस्काराबद्दल डॉ भूषण मगर यांचे समाजामध्ये सर्वेत्र कौतुक केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments