फलक रेखाटन
‘अखेरचा सलाम’
धुळे (प्रतिनिधी) -भारताचे पहिले सरसेनाध्यक्ष,अतुलनीय धैर्य, परिश्रमी, देशाच्या सशस्त्र दलांच्या एकत्रिकरणाची योजनांची आखणी व सुरक्षा यंत्रणांच्या आधुनिकरणातील मोठे योगदान देणारे भारताचे शूरवीर ,देशभक्त, उत्कृष्ट नेतृत्व गुण असणारे सैनिक *जनरल बिपीन रावत यांचा आपल्या पत्नीसह अन्य अकरा सेना सहकाऱ्या सोबत कुंनूर(तामिळनाडू) येथे हवाई दलाच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटने मुळे देशाच्या सेनादलांवर मोठा आघात झाला आहे.
देशाचे जनरल बिपीन रावत यांना रंगीत खडू माध्यमातून केलेल्या फलक रेखाटनातून ‘अखेरचा सलाम’
व भावपूर्ण श्रद्धांजली,,,!
- फलक रेखाटन- राजेंद्र भदाणे.(कलाशिक्षक, जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेचे, माध्यमिक विद्यालय, गरताड,ता.जि. धुळे )