Home आरोग्य निरीक्षक यांच्या कामाची तक्रारीनुसार चौकशी न केल्यास सावदा न.पा.समोर उपोषण – नगरसेविका नंदाताई लोखंडे

आरोग्य निरीक्षक यांच्या कामाची तक्रारीनुसार चौकशी न केल्यास सावदा न.पा.समोर उपोषण – नगरसेविका नंदाताई लोखंडे

आरोग्य निरीक्षक यांच्या कामाची तक्रारीनुसार चौकशी न केल्यास सावदा न.पा.समोर उपोषण – नगरसेविका नंदाताई लोखंडे

रावेर तालुका प्रतिनिधी दिलीप चांदेलकर सावदा

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील नगरपालिकेच्या आरोग्य निरक्षक यांच्या कामाची चौकशी होणे बाबत वेळोवेळी दिलेल्या तक्रारी अर्जाची पालिका प्रशासनाने दखल न घेतल्याने पुन्हा सदरील बाबी करिता दि.२२/११/२०२१ रोजी नगरसेविका नंदाताई लोखंडे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांना तक्रारी अर्ज सादर केलेला आहे.

 

व सादर केलेल्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की,पालिकेतील आरोग्य निरीक्षक महेश चौधरी हे ६०% अपंग सून त्यांनी नोकरी लागल्यापासून ते आज पावेतो घेतलेला प्रवास भत्ता अनियमित असेल तर ते वसूल करण्यात यावा. तसेच ते सुरुवातीला वाचमेन पदावर असताना आज रोजी ते आरोग्य निरीक्षक असून त्यांची साधारणता २ वेळा पदोन्नती कशी झाली. शहरातील काही मालमत्ता धारकांकडे पूर्वीपासून स्वच्छालय असून देखील त्यांना स्वच्छालय बांधकामाचे अनुदान कसे वितरित केले.व सन २०११-१२ मध्ये स्वच्छालय व्हक्युमच्या किती पावत्या फाडण्यात आल्या व याकामी डिझेल खर्च किती झाले आहे.तसेच सन २०११-१२ पासून ते आज पावेतोचा डीजल खर्च किती झालेला आहे.इत्यादी बाबीची चौकशी व्हावी. व येत्या १० दिवसात योग्यरीत्या चौकशी होऊन मला न्याय न मिळाल्यास पालिकेसमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिलेल्या निवेदनात नगरसेविका नंदाताई मिलिंद लोखंडे यांनी दिलेला आहे.

विशेषकर असे की, सावदा पालिका सत्ताधारी गटातील माजी उपनगराध्यक्षा व नगरसेविका नंदाताई लोखंडे यांनी जानेवारी २०२१ पासून सदर प्रकरणाची वेळोवेळी तक्रारी करीत असून त्याची एकीकडे मुख्याधिकारी दखल घेत नाही.व दुसरीकडे सत्ताधारी नगराध्यक्षा व त्यांचे नगरसेवक यांनी मौनी बाबाचे व्रत धारण केल्याचे दिसून येते? आणि सत्ताधारी नगरसेवीकेला न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य जनतेचे काय? तसेच या वरून दिसून येते की नगरपालिकेचा कारभार हा एक सावळा गोंधळच आहे.