तांदुळवाडी परिसरामध्ये सतर्कतेने चोरी करणाऱ्या भुरट्या चोरांचे थैमान

0 0
Read Time:1 Minute, 53 Second

तांदुळवाडी ता.भडगाव प्रतिनिधी-(संजय शेवाळे)
तांदुळवाडी परिसरामध्ये सतर्कतेने चोरी करणाऱ्या भुरट्या चोरांचे थैमान

तांदुळवाडी ता.भडगाव प्रतिनिधी-(संजय शेवाळे)
तांदुळवाडी गावालगत २९/११/२०२१ रोजी चाळीसगांव रोडवरील तांदुळवाडी फाट्याजवळ रसवंतीची मोठी धाडसी चोरी करून अद्यापही भुरट्या चोरांचा तपास नाहीच, त्यात दरवर्षी २ ते ४ लाखापर्यंत गुरांची चोरी देखील मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत, आज रात्री तांदुळवाडी गावात प्लॉट एरिया मळगाव रस्त्यावर १ ते ३ च्या दरम्यान ६ गुरांची अज्ञान चोरट्यांनी पसार केले त्यात श्री. योगेश रमेश मिस्टर यांची जरशी गायी ३ – ६०,००० तसेच श्री. संजय लक्ष्मण पवार यांचे २ बैल गावरान जातीचे ४०,००० किमतीचे व आबा वाल्हा पवार यांची १ गाय २०,००० किमतीची एकूण १,२०,००० पर्यंत जनावरे कोणीतरी अज्ञान चोरट्यांनी चोरून नेले. या ८ दिवसाच्या कालावधीमध्ये २ मोठमोठे शार्प बुद्धीच्या चोरट्यांनी हात मारला, तरी या निकमाऊ, भामट्या, चोरांचा भडगाव पोलीस निरीक्षक यांनी या भुरट्या चोरांचा कायम स्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून गुर पालक व गावातील नागरिकांनी तसेच रसवंती मालक केली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %