*वडजी विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन साजरा*

0 0
Read Time:2 Minute, 5 Second

*वडजी विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन साजरा*
भडगांव (प्रतिनिधी) : (संजय शेवाळे) कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे टी.आर.पाटील विद्यालय, इंग्लिश मेडिअम स्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमा पूजन व माल्यार्पण केंद्र प्रमुख़ संजय न्याहिदे यांचे हस्ते मुख्या. प्राचार्य डी. डी. पाटील, मा. मुख्या. बी. वाय. पाटील, पिचर्ड विद्यालयाचे मुख्या. दिपक बोरसे, व्यवस्थापन समिती प्रमुख एस. जे. पाटील, पळासखेडे विद्यालयाचे मुख्या. ए. पी. सिसोदे, महिंदळे विद्यालयाचे मुख्या. ए. पी. बागुल, सह वडजी केंद्रातील सर्व प्राथ. मुख्याध्यापक, शिक्षक प्रतिनिधी सह विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका, सहकारी कर्मचारी यांचे उपस्थितित संपन्न झाले. सदर प्रसंगी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र व अमूल्य योगदानाचे भारतीय लोकशाहीत अत्यंत मह्त्वाचे स्थान आहे असे प्रतिपादन केंद्रप्रमुख संजय न्याहिदे, मुख्या.प्राचार्य डी.डी.पाटील यांनी मनोगतातून व्यक्त केले. सूत्रसंचालन वाय. ए. पाटील, आभार आर. एम. पाटील, समारोप एम. एस. देसले यांनी केला.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %