पाचोऱ्यात शिवसेनेला पुन्हा धक्का ! बालेकिल्ल्यातच भाजपाचा सुरुंग

0 0
Read Time:3 Minute, 12 Second

पाचोऱ्यात शिवसेनेला पुन्हा धक्का….! बालेकिल्ल्यातच भाजपाचा सुरुंग

अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

पाचोरा- येथील पाचोरा ग्रामीणसह आता शहरात देखील शिवसेनेला गळती लागली असून भाजपाने एका पाठो-पाठ एक शिवसेनेला धक्का द्यायला सुरुवात केली आहे. नुकत्याच एकमेव पंचायत समिती सदस्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शेकडो कार्यकर्त्यांसमवेत मा.मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला असताना, गेल्या काही दिवसांपासून शहरात शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे अनेक लोकप्रतिनिधी,पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगत असताना आता प्रत्यक्षात भाजपाने पाचोरा शहरातील शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभाग क्र.०४ व ०५ मध्येच सुरुंग लावला असून येथील सर्वच्या सर्व कट्टर शिवसैनिक यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपाच्या अमोल शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्याशी चर्चा केली असता शिवसेनेमधील वाढती घुसमटता व आमदार किशोर पाटील हे जनतेचे व कार्यकर्त्यांचे प्रश्न व समस्या सोडविण्यात असमर्थ ठरत असल्याचे सांगून शिवसेनेला कायमचा जय महाराष्ट्र करत असल्याचे त्यांनी सांगितले.
ही तर सुरुवात असून येणाऱ्या काळांत शिवसेना व राष्ट्रवादी ला मोठे भगदाड पडेल तसेच प्रवेश केलेल्या सर्वांचा भाजपात योग्य तो सन्मान राखून लवकरच शहरांतील महत्वाच्या जबाबदाऱ्या देखील दिल्या जातील आणि येणाऱ्या काळांत पाचोरा व भडगाव दोघे तालुके मिळुन भव्य असा प्रवेश सोहळा मा.मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात होईल असे परत एकदा अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले.याप्रसंगी डॉ.भुषण मगर,भाजपा शहराध्यक्ष रमेश वाणी,विकास वाघ (गोटू शेठ),सरचिटणीस दिपक माने,भाजयुमो शहराध्यक्ष समाधान मुळे,राहुल गायकवाड, टिपू देशमुख,विरेंद्र चौधरी, जगदीश पाटील,समाधान पाटील,हरीश पाटील,

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %