*संस्था ताब्यातून जाऊ नये या उद्देशाने सहकार अधिकारी गवळी कडून निवडणूक घेण्यास टाळाटाळ!*
रावेर तालुका प्रतिनिधी दिलीप चांदेलकर सावदा
सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील सावदा मर्चंट पत्संस्थेचे प्राधिकृत अधिकारी हे तालुका निवडणूक निर्णय अधिकारी असताना सदर पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी कोणतेही ठोस पाऊल उचलत नव्हते यांना संस्थाचे सभासदांनी निवडणूक घेण्याकरिता लागणारी ६ लाख रुपये इतकी रक्कम जानेवारी २०२१ मध्ये जमा करून ठेवलेल्याची अधिकृत माहिती असूनही निवडणूक घेण्याकरिता अधिकारी गवळी हे संवेदनशील नसल्यामुळे अखेर सभासदांनी संबंधित विभागाकडे तक्रार दाखल केली होती.मात्र संस्था ताब्यातून जाऊ नये या उद्देशाने सदरील अधिकारी निवडणूक घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचे सभासदाकडून म्हटले जात होते व आहे.
परंतु निवडणूक घेण्यासंदर्भात सभासद अशोक त्र्यंबक वाणी वगैरे यांनी केलेल्या तक्रारीची अखेर दखल घेऊन राज्याचे सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी दि.२/१२/२०२१ रोजीच्या एका आदेशान्वये सदर अधिकाऱ्याला संस्थांची निवडणूक घेण्याचे लेखी कळवलेले असून त्यात सदरील संस्था मंडळातील सदस्यांनी सुद्धा निवडणूक प्रक्रिया उक्त आदेशाप्रमाणे उचित कारवाई करण्याचे सुद्धा म्हटलेले आहे.
मात्र प्राधिकृत अधिकारी गवळी यांना कोणते आणि कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत राहत असलेली सावदा मर्चंट संस्थाचा ताबा सोडायचा नाही. हे स्पष्टपणे दिसून येते तरी यामागील कारण काय? ही बाब समजण्याच्या पलिकडची आहे. म्हणून निवडणूक घेण्याकरिता त्यांच्याकडून होत असलेली जाणीवपूर्वक व हेतुपुरस्सर टाळाटाळ बाबत व सावदा मर्चंट पत संस्थेच्या नावाचे इमारतीवर असलेले फलक गवळी यांनी काढून ठेवलेले आहे अशी माहिती पत संस्थेचे व्यवस्थापक रवींद्र रमेश वाणी यांनी प्रतिनिधीशी संवाद साधून सांगितले व खेद व्यक्त केला आहे.