भडगाव तालुक्यातील प्रोटॉन शिक्षक संघटने चे एक दिवसीय धरणे आंदोलन यशस्वी.

0 0
Read Time:3 Minute, 2 Second

भडगाव प्रतिनिधि( संजय शेवाळे) तालुक्यातील प्रोटॉन शिक्षक संघटने चे एक दिवसीय धरणे आंदोलन यशस्वी.

आज दिनांक 29 ऑक्टोबर 2021 रोजी भडगाव तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांचे पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसीय जर धरणे आंदोलन प्रोटाॅन संघटनेच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले सदर आंदोलनात म.गट विकास अधिकारी व म गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती भडगाव यांचेकडे खालील मागण्यांचे पूर्तता करणे बाबत निवेदन देण्यात आले तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचा सातव्या वेतन आयोग फरकाचा पहिला हप्ता संबंधित कर्मचाऱ्यांना जीपीएफ खाती सन 2019 मध्ये जमा होणे अपेक्षित असताना जमा झालेला नाही संबंधित रकमेवरील मागील दोन वर्षात व्याजाचे आर्थिक नुकसान होणार आहे ती रक्कम संबंधितांच्या खात्यावर त्वरित जमा करण्यात यावे. प्रोटॉन संघटनेच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलनात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना,महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती,शिक्षक परिषद, शिक्षक भारती, डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक संघ, राष्ट्रवादी शिक्षक संघ, जुनी पेन्शन हक्क संघटन, खाजगी प्राथमिक शिक्षक संघटना, माध्यमिक शिक्षक संघटना,व भारत मुक्ती मोर्चा यांच्यासह जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारी सहभागी झाले होते. यामध्ये प्रोटान च्या वतीने हेमंत पाटील,आरीफ जनाब,किसन सूर्यवंशी, रामदास हौसरे, जिजाबराव पाटील, यशराज निकम,अश्फाक जनाब, निलेश हिरे, सुरेश बोरसे, ध्रुव राजपूत,अनिल पाटील, संजय विसपुते, प्रशांत साळुंखे, संजीव बेनाडे, आबा साहेब पगार,राकेश पाटील, सोबतच भारत मुक्ती मोर्चाचे देविदास राठोड पंकज मोरे शुभम माळी हरी राठोड उपस्थित होते . याप्रसंगी प्रोटान चे जिल्हाध्यक्ष मिलिंद भालेराव,प्रशांत लवंगे हेमंत भदाने व त्यांचे सहकारी यांनी भेट दिली

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %