शेतकऱ्यांचे कट केलेली वीज तात्काळ चालू करावे- प्रहार जनशक्ती पार्टीचे पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली मागणी.
रावेर तालुका प्रतीनीधी दिलीप चांदेलकर
सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर यावल तालुक्यामध्ये आसमानी व सुलतानी संकटापासून ग्रस्त शेतकऱ्यांचे गेल्या चार वर्षापासून सतत होत असलेले नुकसान सर्वांना कळून चुकलेले आहे याबाबत महाराष्ट्र शासनाला देखील अधिकृत माहिती असताना सध्या वीज वितरण कंपनीकडून सक्तीची वसुली केली जात असून आर्थिक डबघाईस गेलेल्या शेतकरी वीज बिलाची रक्कम भरू शकत नाही अशी विदारक परिस्थिती मध्ये सापडलेला शेतकरी वर्गाच्या शेतातील वीज कनेक्शन महावितरण कडून कट केले जात आहे. म्हणून सदरील कट केलेले वीज कनेक्शन तात्काळ जोडण्यात यावे व सक्तीची वीज वसुली थांबवण्यात यावी अशी मागणीचे निवेदन नुकत्याच सावदा वीज वितरणाचे कार्यकारी अभियंता सपकाळे यांना प्रहार जनशक्ती पार्टीचे रावेर यावल विधान क्षेत्र प्रमुख शेख अलीम मोहम्मद रफीक, रावेर तालुकाध्यक्ष दुर्गादास उर्फ पिंटू धांडे, यावल तालुकाध्यक्ष सुभाष सोनवणे यांच्या सह पदाधिकाऱ्यांनी निवेदन द्वारे मागणी केलेली आहे.
रावेर यावल तालुक्यातील शेतकरी व जनता करोना महामारी सुरू झाल्यापासून आजतागायतच्या कालावधीत आर्थिक संकटात सापडले असून काम धंदे ठप्प असल्यामुळे बाजारपेठ सुद्धा बंद असून शेतकरी वर्ग फार विवंचनेत सापडलेला आहे. त्यात नैसर्गिक आपत्ती मुळे तो कर्जबाजारी देखील झालेला असुन त्यांची कट केलेली वीज कनेक्शन तात्काळ जोडून विज चालू करावे. व महावितरण कडून सक्तीची वीज वसुली सुद्धा थांबवण्यात यावी अन्यथा शेतकऱ्यांना न्याय देण्याकरिता लोकशाही मार्गाने प्रहार जनशक्ती पार्टी मोठ्या ताकतीने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असे दिलेल्या निवेदनात म्हटलेले आहे.
असा इशारा देताच कट केलेले वीज कनेक्शन त्वरित जोडण्यात येईल असे आश्वासन त्यावेळी सदरील संबंधित कार्यकारी अभियंता सपकाळे यांनी प्रहार जनशक्ती पार्टीचे पदाधिकाऱ्यांना दिले.