पाचोर्यात आ. तांबे नी घेतली कॉंग्रेस ची आढावा बैठक

0 0
Read Time:2 Minute, 27 Second

पाचोर्यात आ. तांबे नी घेतली कॉंग्रेस ची आढावा बैठक

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा कॉंग्रेस ची आढावा बैठक नुकतीच आ. तांबे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली बैठकीत कॉंग्रेस च्या पुढील वाटचालीसाठी ठरविण्यात आले.

कॉंग्रेस पक्षातील कार्यकर्ते सह पदाधिकारींच्या समस्या जाणून घेण्यासाठी कॉंग्रेस चे पदवीधर मतदारसंघातील आ. सुधीर तांबे यांनी नुकतीच बैठक घेतली या बैठकीला तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांची प्रमुख उपस्थितीत पाचोरा तालुका कॉंग्रेस चा आढावा देण्यात येऊन आगामी काळात पक्षाचे संघटनवर भर देण्यात आले. यावेळी आ. तांबे यांनी कॉंग्रेस च्या कार्यकर्ता सह पदाधिकारींना येणाऱ्या काळात आरोग्य समस्या, प्रशासकीय समस्या, प्रत्येक गावातील संघटन यावर चर्चा केली. आ. तांबे यांच्या भेटीमुळे कार्यकर्त्यां मध्ये नवचैतन्य निर्माण झाले. यावेळी बैठकीत तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, प. स. माजी सभापती शेख इस्माईल शेख फकीरा, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अंबादास गिरी, राजेंद्र महाजन,प्रा. एस. डी. पाटील, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शरीफ खाटीक,शहर अध्यक्ष शरीफ शेख, महिला जिल्हा सरचिटणीस कुसुमताई पाटील, संगीता नेवे, तालुका अध्यक्षा अॅड मनिषा पवार,कल्पना निंबाळकर, प्रकाश चव्हाण, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे,युवक विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, शिवराम पाटील, प्रदीप पाटील, आदी उपस्थित होते

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %