Friday, May 20, 2022
Homeस्वस्त धान्य घेणाऱ्या व लाभार्थी विक्रेत्यांवर रावेर तहसीलदार ठोस कारवाई करण्याचा आदेश...
Array

स्वस्त धान्य घेणाऱ्या व लाभार्थी विक्रेत्यांवर रावेर तहसीलदार ठोस कारवाई करण्याचा आदेश कधी देणार ?

स्वस्त धान्य घेणाऱ्या व लाभार्थी विक्रेत्यांवर रावेर तहसीलदार ठोस कारवाई करण्याचा आदेश कधी देणार ?

“तालुक्यात धान्य तस्करांचा पसरत आहे जाळ”

रावेर ता. प्रतिनिधी दिलीप चांदेलकर सावदा

सावदा:- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा व परिसरात सरकारद्वारे भेटत असलेले धान्य खरेदी करण्यासाठी मालवाहतूक रिक्षा द्वारे प्रत्येक गल्लीबोळात भटकून गहू तांदूळ आहे का गहू तांदूळ आहे का? अश्या कर्कश आवाजात उघडपणे आरोळ्या मारून गरजू गोरगरीबांना मिळालेले धान्य पैशाचे आमिष दाखवून विकत घेणारा रॉकेट सक्रिय झालेला आहे. अशी सविस्तर बातमी “सावदा शहरात गहू तांदूळ आहे का? गहू तांदूळ आहे का?” या मथळ्याखाली ३ दिवसापूर्वी न्युज झेप इंडिया यांनी प्रसिद्ध केली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की,आर्थिक दुर्बल घटक निराधार व्यक्तीं सह विविध योजनेअंतर्गत लाभार्थींना स्वस्त धान्य दुकानदारांकडून शासनातर्फे मोफत धान्य मिळत असते.दर महिन्याला शासनाद्वारे हे धान्य भरपूर प्रमाणात मोफत किंवा कसे मिळतात. मात्र लाभार्थी हे धान्य आपल्या भागातील येणाऱ्या व स्वतःच्या उपजीविकाचे साधन असलेले धान्य गल्लीबोळात मालवाहू रिक्षा द्वारे फिरून गहू प्रति किलो १३ रुपयेप्रमाणे व तांदूळ १५ रुपयेप्रमाणे विकत घेऊन सदरील मालवाहू रिक्षा वाले दरमहा सावदा व परिसर आणि तालुक्यातून साधारणता हजारो क्विंटलच्या दरम्यान धान्य साठा जमा करून ते नेतात तरी कुठे? तसेच गेल्या चार दिवसापूर्वी चोपडा कडून यावलकडे येणाऱ्या एका ट्रकला गुप्त माहितीवरून पोलिसांनी पकडले असता त्यामध्ये अशाच प्रकारे जमा केलेला धान्यसाठा काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असताना पकडण्यात आला. हा सदरचा प्रकार रावेर तालुका सह जळगांव जिल्ह्यात तर पसरलेला नाही? तरी इतक्या मोठ्या प्रमाणात पैशाचे आमिष दाखवून गरजू गोरगरिबांच्या उपजीविकाचे साधन असलेले धान्य माफियांकडून सदर प्रकारे माणसा द्वारे रॅकेट चालवला जात असून हजारो क्विंटल धान्यचा काळाबाजार होत आहे.तरी थेट अमळनेर येथील कर्तव्यदक्ष तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी सुरू असलेल्या सदरच्या गोरखधंद्या बाबत आपल्या भागात शासनाचे धान्य विक्री करणारे लाभार्थी व घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासह विविध प्रकारे कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात ज्या पद्धतीने आदेश पारित केले.त्या प्रमाणे रावेर तहसीलदार हे आदेश काढतील का? याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments