जळगाव जिल्हापाचोरा-भडगाव

वरखेड येथील बाजारातून गुरांची कत्तलखान्याकडे रवानगी, संबंधितांचे दुर्लक्ष

वरखेड येथील बाजारातून गुरांची कत्तलखान्याकडे रवानगी, संबंधितांचे दुर्लक्ष

दिनांक~२१/१०/२०२१

आज वरखेडी गुरांच्या बाजारातून कत्तलीसाठी जाणाऱ्या गाडीला अडवून काही तरुणांनी ते वाहन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला जमा केले असल्याचे समजले असून या गुरे वाहतूक करणाऱ्या गाडी मालकावर तसेच गुरे विकत घेऊन कत्तलीसाठी नेणाऱ्या इसमावर कायदेशीर कारवाई करुन पकडलेली गुरे गोशाळेत जमा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

परंतु जळगाव जिल्ह्यातील नेरी, नगरदेवळा, वरखेडी, येथील गुरांचा बाजार महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. परंतु या बाजारातून गुरांची खरेदी-विक्री करतांना काही लोक दलालांमार्फत किंवा हस्तकांना मार्फत गुरांची परस्पर खरेदी करून ती गुरे कत्तलखान्याकडे रवाना करत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

ही गुरे कत्तलखान्यापर्यंत नेतांना प्रमाणापेक्षा जस्त भरुन निर्दयपणे वाहतूक केली जाते. तसेच वाहन धारकाकडे गुरे वाहतूकीची परवानगी नसतांना हे वाहन धारक दिवसाढवळ्या गुरांची वाहतूक करतात. ही वाहतूक करतांना पोलिसांच्या लक्षात येऊ नये म्हणून गुराढोरांचे पाय व तोंड बांधून एकावर एक अशी रचून त्यावर कडबा टाकून झाकली जात असल्याने वाहतूकी दरम्यान बरीचशी गुरे मरण पावतात.

तसेच ही गुरांची निर्दयपणे वाहतूक दिसत असल्यावर सुद्धा कायद्याचे रक्षक या गोष्टीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पशू प्रेमी करत आहेत. तसेच जागरूक नागरिक कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गुरांच्या गाड्या अडवून संबंधित पोलिस स्टेशनला जमा करतात. परंतु पोलिस स्टेशनमध्ये काही प्रतिष्ठित व ना~लायक लोकांचा हस्तक्षेप होत असल्याने पोलिसांना खोटे कागदपत्रे सादर करुन गुरांची भरलेली गाडी सोडवली जाते.

हा प्रकार असाच सुरु राहिल्यास भविष्यात जातिवंत, देशी (गावरान) जातीचे दुभती व शेतीला उपयोगी येणारी जनावरे फक्त फोटोत पहावयास मिळतील अशी भिती व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Close