जळगाव जिल्हारावेर-यावल

संवेदनशील :-सावदा ग्रामीण रुग्णालय येथे कायम संगणक चालक नसल्याने परिचारीका संगणक चालवते…

*संवेदनशील :-सावदा ग्रामीण रुग्णालय येथे कायम संगणक चालक नसल्याने परिचारीका संगणक चालवते……!*

रावेर ता.प्रतिनिधी दिलीप चांदेलकर सावदा

सावदा :-जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे सुरू असलेल्या ग्रामिण रुग्णालयाच्या अधीन सुरू असलेले लसीकरण केंद्रावर कायमस्वरूपी संगणक चालक उपलब्ध नसल्याने शाळेतील कर्मचारी व नगरपरिषदेतील घनकचरा ठेकेदाराकडी कर्मचारी तसेच ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका कडून तात्पुरता स्वरूपात लसीकरण केंद्रावर काम करून घेतले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे.

सावदा ग्रामीण रुग्णालयात लस केंद्र उपलब्ध झाल्यापासून आनंदीबाई गंभीरराव हायस्कूल कर्मचारी अमित बेंडाळे यांनी कोराना काळात शाळा बंद असल्या पासून ते जन सेवेकरिता दि.४ ऑक्टोंबर २०२१ पर्यंत संगणक चालक (डाटा एंट्री ऑपरेटर) ची भूमिका बजावली.

त्यानंतर ४ ते ८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत लसीकरण केंद्र सुरू असून संगणक चालक नसल्याकारणाने येथील लसीकरण केंद्र उघडे असून बंद सारख्या स्थितीत दिसून आले.यामुळे लसी पासून नागरिकांना ४ ते ५ दिवस वंचित राहावे लागले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, संपूर्ण जगाला कळून चुकलेल्या कोरोना महामारी पासून नागरिकांचे जीव वाचवण्या कामी अमाप पैसा खर्च करून सरकार तर्फे लसीकरणाची मोहीम संपूर्ण देशभरात चालवली जात असून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याकामी विविध प्रकारच्या माध्यमातून सरकार द्वारे प्रोत्साहित केल्याने नागरिक दररोज लस घेण्यासाठी कोवीड लस केंद्रावरती जातांना दिसत आहे. असे असताना सावदा ग्रामीण रुग्णालयात लस साठा उपलब्ध असून लस केंद्र उघडे असताना फक्त संगणक चालक (कम्प्युटर डाटा एन्ट्री ऑपरेटर) उपलब्ध नसल्याने सदरील लस केंद्र ४ ते ५ दिवसा पासून लस केंद्र ठिकाणी जात असलेल्या नागरिकांना लस न घेता परत यावे लागले होते.यामुळे लसीपासून वंचित वृद्ध महिला पुरूषांच्या चेहऱ्यावरील हिरमोड दिसून आला होता.

तसेच २० ऑक्टोबर २०२१ रोजी परिचारिका एच एस भंगाळे यांनी संगणक ऑपरेटरची भूमिका बजावून दुपारी २-३० पर्यंत एकूण ११२ नागरिकांची लसीकरण केंद्रावरील संगणकात नोंदणी केली. म्हणून त्यांना परिचारिकेचे कामा ऐवजी सदरील भूमिका पार पाडावी लागत असून या ठिकाणी परिचारिका एस आर पाल हे ओपीडी करून त्यांना मदत करीत असल्याचे दिसून आले.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिवाळीनंतर कोरोनाची तिसरी लाट बाबत संभावना व्यक्त केली आहे. तरी संबंधित प्रशासन लसीकरण सुरू झाल्यापासून कायम संगणक ऑपरेटर उपलब्ध न होणे आर एच ग्रामीण रुग्णालया सावदा साठी खेदाची बाब आहे. तसेच कायमचा संगणक ऑपरेटर नसल्याने येणाऱ्या काही दिवसात लसीकरण केंद्रावर बस उपलब्ध असून लसीकरणाचा मंदवल्या आणि यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका उत्पन्न झाल्यास जबाबदार कोण? तरी या अतिसंवेदनशिल विषयाकडे थेट जिल्हाधिकारी, शल्य चिकित्सक जळगांव व डीएचओ जिल्हा परिषद जळगांव यांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Close