जळगाव जिल्हापाचोरा-भडगाव

दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे अशोका बिल्डकॉन विरुध्द नांद्रा येथे २१ तारखेला पुन्हा होणारे तिव्र रास्ता रोको आंदोल.

दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे अशोका बिल्डकॉन विरुध्द नांद्रा येथे २१ तारखेला पुन्हा होणार तिव्र रास्ता रोको आंदोल.

पाचोरा- (प्रतिनिधी) – नांद्रा येथील राष्ट्रीय महामार्गाच्या समस्यां दुर करण्यासाठी २८ ला रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते. परंतु कोरोणाच्या पार्श्वभूमीवर व शेतकरी वर्ग शेती कामात अडकल्याने प्रशासनामार्फत मा.प्रांताधिकारी साहेब, तहसिलदार कैलासजी चावडेसाहेब, पोलिस निरीक्षक किसन नजन पाटिल साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत समन्वय साधून नांद्रा येथील शिष्टमंडळ, ग्राम पंचायत कमिटीचे विनोद तावडे,.सुभाष तावडे, उपसरपंच शिवाजी तावडे,किशोर खैरनार,आनंदा पेंटर,नितिनदादा तावडे ,पोलिस पाटील किरण तावडे,पञकार प्रा.यशवंत पवार,संतोष ब्राम्हणे,अभिमन पाटिल व ग्रामस्थ नांद्रा व राष्ट्रीय महामार्ग चे व्यवस्थापन अधिकारी बोरसे साहेब यांच्यात झालेल्या सांगोपांग चर्चेतून मा.तहसिलदार चावडेसाहेब यांच्या समोर त्यांच्या दालनात एक एक विषयावर चर्चा घडून आल्याने राष्ट्रीय महामार्गचे समन्वयक बोरसे साहेब यांनी ही आपल्या कंपनी ची भूमिका मांडली त्याच बारोबर वरीष्टांच्या मार्गदर्शनाने २७ जूलै रोजी चर्चा झाल्यानंतर सर्व चर्चा सकारात्मक भूमिकातून सोडविण्यासाठी दिनांक २८ जूलै रोजी धूळे येथील राष्ट्रीय महामार्गच्या कार्यकारी विभागीय अभियंता कल्याणी पाटील आल्यावर पुन्हा सर्व विषयावर चर्चा करुन सर्व मागण्या मान्य करुन लेखी स्वरूपात दिलेल्या आश्वासनामुळे नांद्रा येथे होणारे रस्ता रोको आंदोलन ग्रामपंचायत कमिटी नांद्रा व ग्रामस्थ यांनी तूर्त स्थगित केले होते.

परंतु आता तब्बल तिन महिने होऊन ही कोणत्याही कामाची पुर्तता आद्याप न झाल्याने नांद्रा ग्रामपंचायत कमिटी व नांद्रा येथील त्रस्त ग्रामस्थांनी दिनांक २१ ऑक्टोबर गुरुवार रोजी सकाळी १० वाजता नांद्रा बसस्थानकावर रस्तारोको आंदोलनाचा पवित्रा घेतलेला असून अशोका बिल्डकॉनचे कोणतेच वाहन रस्त्यावर फिरु देणार नसल्याचे आल्टिमेटम कंपनीला देण्यात आला आहे.

नांद्रा येथिल सर्व साईडचे काम पाहणारे बोरसे यांची आताच साईड बदल करुन दुसऱ्या ठिकाणी बदली करण्याचे कारण काय? त्यांनी नांद्रा ग्रामपंचायत व ग्रामस्थांना दिलेले सर्व रस्ते सुव्यवस्थीत करून देण्याचे आश्वासन दिले होते . त्याचे काय झाले? अशा एक ना अनेक समस्या पैकी बसस्थानकावरील मुतारी बांधणे,दलीतवस्तीकडून गावात जाणाऱ्या रस्त्यावर पाईप टाकणे ,प्राथमिक आरोग्य केंद्राचा रस्ता तयार करणे,विष्णूदास महाराजांच्या मठाकडे जाणारा रस्ता पाईप टाकून तयार करणे या सर्व विषयावारील दि.२७ व २८ जूलैला तहसिलदारसाहेब यांच्या दालनात झालेल्या सकारात्मक चर्चाला अशोका बिल्ड्कॉन कडून खो..देण्यात आलेला आहे.

म्हणून असून दिनांक २१ आक्टोबर गुरुवार पुन्हा तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात रस्ता रोको करतांना सार्वजनिक किंवा कुणाच्या स्थावर मालमत्तेचे नुकसान झाल्यास तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अशोका बिडकॉनच जबाबदार राहील असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Close