Home महिला दक्षता अध्यक्षा योजना पाटील यांनी नवरात्र उत्सव निमित्त केला महिलांचा सन्मान

महिला दक्षता अध्यक्षा योजना पाटील यांनी नवरात्र उत्सव निमित्त केला महिलांचा सन्मान

महिला दक्षता अध्यक्षा योजना पाटील यांनी नवरात्र उत्सव निमित्त केला महिलांचा सन्मान
भडगांव (प्रतिनिधी) नवरात्र उत्सव निमित्त महिला दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील यांनी नवरात्र उत्सव निमित्त नवदुर्गा रूपी नऊ यशस्विनी महिलांचा खण नारळाची ओटी भरून औक्षण केले. घटस्थापना नवरात्र आरंभ पासून नगरसेविका योजना पाटील विविध सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य, सुख, संपत्ती, प्रगतीसाठी देवी नवदुर्गा चरणी शक्ति सामर्थ्यसाठी प्रार्थना केली. तसेच युवती महिलांना उदयोगशील जगतात आपले मोलाचे योगदान असावे यासाठी विविध विकासात्मक कार्यात महिलांचा सहभाग असावा यासाठी मार्गदर्शन करीत असतात. संसार प्रपंच सांभाळुन नेहमी सामाजिक उपक्रम कार्यात सहभागी असलेल्या महिलांच्या कार्याचे कौतुक व्हावे व त्यांना सन्मान रूपी प्रेरणा मिळावी म्हणून अनुक्रमे दुर्गाताई पाटील, कल्पना ठाकरे, विद्या पाटील, योगिता पाटील, गायत्री महाजन, मोनाली बागल, सुमित्रा नलावडे, मिनाक्षी जाधव, दिपाली कुलकर्णी आदि यशस्वीनी महिलांचा नगरसेविका योजना पाटील यांनी सन्मानरूपी गौरव केला.