नगाव गटातून महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस उमेदवाराच्या जि.प.निवडणूक प्रचाराचा शुभारंभ प्रचार रॅलीला अभूतपुर्व प्रतिसाद

0 0
Read Time:4 Minute, 30 Second

नगाव गटातून महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस
उमेदवाराच्या जि.प.निवडणूक प्रचाराचा शुभारंभ
प्रचार रॅलीला अभूतपुर्व प्रतिसाद
धुळे जिल्हा प्रतिनिधी – सतिष पवार
संपर्क – ९५२७७९९३०४
धुळे- काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडीने धुळे जिल्हा परिषद पोटनिवडणूकीच्या प्रचाराचा शुभारंभ नगावपासून धुमधडाक्यात सुरु केला असून आज दि.26 सप्टेंबर रोजी आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.यावेळी निघालेल्या प्रचार रॅलीला अभूतपुर्व प्रतिसाद मिळाला. नगाव गटातील मतदार परिवर्तनासाठी सज्ज झाल्याचे वातावरण पहावयास मिळाले.
धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकिची जिल्ह्यात प्रक्रिया सुरु झाली असून महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमदेवार म्हणून नगाव गटातून सागर ज्ञानेश्‍वर पाटील हा नवा व उमदा उमेदवार देण्यात आला आहे.त्यामुळे या गटात भाजपाला काँग्रेस चांगलीच टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे.धुळे तालुक्यातील महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ नगाव गटापासून सुरु करण्यात आला असून आज दि.26 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता प्रचाराला सुरुवात करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते नगाव गावातील हनुमंताच्या मंदिरात नारळ वाढवून प्रचारांचा शुभारंभ झाला. त्यानंतर आ.पाटील यांच्या उपस्थितीत नगाव गावातून प्रचारफेरी काढण्यात आली. ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजी करण्यात आली. यावेळी गावातील माताबघिनींनी आ.कुणाल पाटील आणि उमेदवाराचे औक्षण करुन स्वागत केले. दरम्यान महाविकास आघाडीचे झेंडे आणि घोषणांनी गावात काँग्रेसमय वातावरण झाले होते.आ.पाटील आणि उमेदवार व महाविकास आघाडीतील पदाधिकार्‍यांनी घराघरात जावून मतदारांच्या गाठीभेटी व आर्शिवाद घेतले.
*गावातच विकास नाही- नगाव गावातील पदाधिकारी गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायत,जि.प., पंचायत समितीची पदे उपभोगत आहेत गावात कोणतेही विकास काम अद्याप झाले नसून पाणी टंचाई, गटारी, अस्वच्छता असे अनेक प्रश्‍न आजही तसेच असल्याचे सांगत मतदारांनी समस्यांचा पाढाच वाचला.
प्रचारफेरीत आ.कुणाल पाटील यांच्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे, पं.स.चे माजी सभापती भगवान गर्दे,पं.स.चे माजी सभापती कैलास पाटील, काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अशोक सुडके, राष्ट्रवादीचे नेते प्रशांत भदाणे, सायने सरपंच योगेश पाटील,मुकेश पाटील,गुलाबराव पाटील,संचालक बापू खैरनार, अजब पाटील,जितेंद्र पवार,ज्ञानेश्‍वर मराठे, भोलेनाथ पाटील, जगन्नाथ बैसाणे यांच्यासह नगाव गटातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %