जळगाव जिल्हापारोळा-एरंडोल

एरंडोल येथे ऐन गणेशोत्सव काळात गुरांच्या अवैध वाहतुकीवर पोलिसांची कारवाई,५बैलांसह ६लाख ३२हजार सहाशे रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त

एरंडोल:येथे धरणगाव हाय-वे चौफुली वर नाकाबंदीच्या कर्तव्यावर असतांना पोलिस कॉन्स्टेबल संतोष चौधरी यांनी ३० हजार रूपये किमतीच्या ५बैलांची अवैध वाहतुक करणार्या पिकअप गाडीला बुधवारी १५ सप्टेंबर२०२१ रोजी सायंकाळी उशिरा रंगेहाथ पकडले.
एम.एच.०५ बी.एच.९२०३ क्रमांकाची बोलेरो पिकअप गाडी ५ बैलांना कत्तलिसाठी नेण्याच्या उद्देशाने धरणावकडून येऊन म्हसावद कडे जात असताना मिळून आली.
यावेळी हाय-वे चौफुलीवर नाकाबंदीला असलेले पोलिस कर्मचारी संतोष चौधरी यांनी सदरील वाहनास रंगेहाथ पकडले.

    याबाबत  एरंडोल पोलीस स्टेशन ला भाग६ गु.र.नंबर कलम महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुुधारणा) अधीनियम १९९५ चे कलम ५अ(१)प्रमाणे प्राणीक्लेश प्रतीबंधक कायदा १९६० चे कलम ११(१)(डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रामू अर्जून शिंदे व अनिल रमेश नोजे दोघे रा.दहीवद ता. शिरपूर (धुळे) या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम पाटील, संदीप पाटील,संदीप सातपुते हे पुढील तपास करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close