जळगाव जिल्हापाचोरा-भडगाव

येथील ग्रामसेविका यांच्या मनमानी कारभाराचा कळस :- ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला ठोकले कुलूप कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

तांदुळवाडी – (प्रतिनिधि संजय शेवाळे )- येथील ग्रामसेविका यांच्या मनमानी कारभाराचा कळस :- ग्रामस्थांनी ग्रामपंचायत ला ठोकले कुलूप कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

भडगाव दि.16 :- येथील कार्यरत असलेल्या ग्रामसेविका सविता पांडे यांच्या मनमानी कारभाराबाबत आज रोजी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात कुलूप लावले.सतत सतत गैरहजर राहत असल्याने व ग्रामस्थांशी उर्मट पणाने वागत असल्याने त्यांच्या मनमानी कारभाराचा कळस गाठला आहे.या बाबत 5 -8-2021 रोजी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रथम गटविकास अधिकारी यांना त्यांच्या तक्रारी बाबत निवेदन दिले होते.मात्र गटविकास अधिकारी यांनी कोणतीही दखल घेतली नाही.उलट माझे काहीही होणार नाही तुम्हाला काय करायचे ते करा आम्हाला वरिष्ठ अधिकारी यांना ठराविक रक्कम देते त्यामुळे माझे काहीही होणार नाही असे सांगून पुन्हा डिवचले.या बाबत पुन्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे वतीने तालुका अध्यक्ष खेडकर आण्णा यांनी गटविकास अधिकारी यांना याबात निवेदन दिले मात्र निवेदन देऊन सुद्धा गटविकास अधिकारी यांनी चौकशी करून कार्यवाही करणार असे सांगितले असता अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्रामसेविका सविता पांडे यांच्या बोलण्यावरून कुठेतरी पाणी मुरतेय असे दिसतेय म्हणून कोणतीही कार्यवाही न करता या बाबत महसूल आयुक्त नाशिक यांना पुन्हा निवेदन दिले मात्र संबंधित अधिकारी त्यांना पाठीशी घालत असल्याचे चित्र दिसून येत आहे या बाबत तात्काळ कार्यवाही न झाल्यास ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या तर्फे आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा न्युज झेप इंडिया शी बोलतांना दिला आहे मात्र या बाबत गटविकास अधिकारी रमेश वाघ यांना विचारले असता त्यांनी या बाबत ग्रामसेविका सविता पांडे यांना या पूर्वी समज दिली होती आता चौकशी करून तथ्य आढळल्यास कारवाई केली जाईल असे आपली प्रतिक्रिया देयांना सांगितले.ग्राम पंचायत कार्यालयास कुलूप लावते प्रसंगी जयवंत पाटील पंजाबराव पवार सिध्दार्थ बागुल पीरन पवार अंकुश पाटील भावसिंग सोनवणे दगा मोरे एकनाथ कुर्हाडे निंबाजी बुधा पवार कल्याण पवार दिनकर सोनवणे भाऊसाहेब पवार विलास खैरनार शालीक पवार नायबराव पाटील रमेश पवार आत्माराम पवार यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close