जळगाव जिल्हारावेर-यावल

आश्चर्यजनक :- माती व कचऱ्याने भरलेली गटारमध्ये उगली झाडे : सावदा पालिकेला साफसफाईचा विसर…!

आश्चर्यजनक :- माती व कचऱ्याने भरलेली गटारमध्ये उगली झाडे : सावदा पालिकेला साफसफाईचा विसर…!

“मुख्याधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज”

सावदा प्रतिनिधी दिलिप चांदेलकर

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा नगरपालिकेच्या हद्दीतील पंजाब नॅशनल बँक पासून स्वामीनारायण नगर कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर संपूर्ण शहराला पुरवठा करणारी जलकुंभ टाकीच्या स्वरक्षण भीतीला लागूनच पालिकेकडून बांधलेल्या गटारीत माती व कचरा साचल्यामुळे थेट पावसाळ्याच्या दिवसात त्या गटारीत झाडे उगलेली आहेत. व यामुळे पावसाळ्याचे पाणी गटारीत न जाता थेट येथील मुख्य रस्त्यावर साचलेला असते.सबब येथील रहिवासी व ये-जा करणाऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

पावसाळ्यापूर्वी संपूर्ण शहरातील गटारी नैसर्गिक नाले रस्त्यांची योग्यरीत्या साफसफाई करण्यात आलेली नाही व याबाबत पालिका प्रशासन सुद्धा गंभीर दिसत नसल्याचे व फक्त कागदांवर स्वच्छता अभियान राबविला जात असल्याचे या पाच वर्षात वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. अशी चर्चा नागरिकांमध्ये चालते. तसेच कोरोना काळात अस्वच्छता मध्ये सावदा पालिकेने १०२ वा क्रमांक मिळवलेला होता. तसेच सदरील प्रकार हा अस्वच्छता मध्ये अधिक भर पडत असून पालिकेतील संबंधित अधिकारी व कर्मचारी हे साफसफाई करणे मध्ये गंभीर नाही याचे बोलके उदाहरण गटारीत उगलेली झाडे आहेत.

संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करणारी जलकुंभ टाकीच्या परिसरात रस्त्यालगत लोकांचा रहिवास व दवाखाना, केळी व्यापाऱ्यांची दुकाने असून सदरील माती व कचऱ्याने भरलेल्या गटारीत झाडे उगल्यामुळे रस्त्यावर साचलेल्या न वाहणाऱ्या या पाण्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्याला सुद्धा धोका नाही का? गेल्या दोन वर्षापासून नागरिक कोरोना आजारापासून त्रस्त असून पावसाळ्याचे साचलेले पाणी मुळे विषारी डास मच्छर यांची उत्पत्ती होते यामुळे लोकांच्या आरोग्यास विविध प्रकारचा धोका असतो. हे मात्र खरे आहे.

गेल्या कित्येक महिन्यांपासून सदरील गटार ची साफसफाई झाली नसल्यामुळे त्यात माती व कचरा साचल्याने पावसाळ्याच्या पाण्यामुळे त्यात पाणी वाहून जाण्या ऐवजी थेट झाडे उगलेली आहेत. म्हणून तात्काळ याकडे पालिकेला लाभलेले नवीन मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी लक्ष देऊन गटारीची साफसफाई करण्याची व्यवस्था लावावी.तसेच साफसफाई बाबत गंभीर नसलेले संबंधित अधिकारी
व कर्मचार्‍यांवर सुद्धा नियमानुसार कारवाई करावी.

Related Articles

Close