खान्देश

आ.कुणाल पाटील यांची कृषी विभागाशी बांधावरच बैठक

आ.कुणाल पाटील यांची कृषी विभागाशी बांधावरच बैठक
सलग दोन दिवसांपासून अतिवृष्टी नुकसानीची पाहणी

प्रतिनिधी -सतिष नामदेव पवार -संपर्क – ९५२७७९९३०४

धुळे-धुळे तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची सलग दोन दिवसांपासून आ. कुणाल पाटील हे थेट शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करत असून शेतकऱ्यांच्या बांधावरच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तात्काळ पंचनाम्याच्या सूचना देत आहेत. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. आज दि.१२सप्टेंबर रोजी आ. कुणाल पाटील यांनी नेर, लोहगड, लोणखेडी,भदाणे फाटा,अकलाड, मोराने, उडाने, गोताणे या भागात जाऊन नुकसानीमुळे झाले कपाशीची आणि खरीप पिकांची पाहणी केली.
दिनांक ११ व १२ सप्टेंबरच्या गेल्या दोन दिवसापासून धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील धुळे तालुक्यात अधिकारी व शेतकऱ्यांच्या समवेत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाली असून आमदारांच्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यामुळे त्यांना दिलासाही मिळत आहे. गेल्या दोन आठवड्यापासून संततधार आणि मुसळधार पाऊस सर्वत्र सुरू असून त्यामुळे कपाशी सह खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. आमदार कुणाल पाटील यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावरच जाऊन कृषी विभाग आणि शेतकऱ्यांच्या संयुक्त बैठका घेण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड दिलासा मिळत आहे. गेल्या दोन दिवसापासून आमदार पाटील अतिवृष्टीची नुकसानीची पाहणी करत असून याबाबत कृषिमंत्री महसूल मंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शंभर टक्के नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार कुणाल पाटील यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करताना सांगितले. दरम्यान तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी,कृषी सहाय्यक तलाठी यांनी प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानीचा पंचनामा करावा अशाही सूचना आमदार कुणाल पाटील यांनी नेर येथे पाहणी दरम्यान उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना केल्या. ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेले आहे त्या संपूर्ण तालुक्यातील नुकसानीचा पंचनामा चार ते पाच दिवसात शासनास सादर करण्यात येईल असे तालुका कृषी अधिकारी व्ही. आर. प्रकाश यांनी यावेळी सांगितले.सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी- राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून बळीराजाच्या प्रत्येक संकटात सर्व प्रकारची मदत करण्यासाठी तत्पर असते. त्यामुळे बळीराजाने कोणत्याही संकटाला न जुमानता धीराने तोंड द्यावे. तुमच्या प्रत्येक संकटात मी खांद्याला खांदा लावून लढा देण्यास तयार आहे. प्रसंगी शेतकऱ्यांच्या हितासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारशी लढा उभारण्याची तयारी असल्याचे आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले.अतिवृष्टी नुकसानीच्या पाहणी दरम्यान आमदार कुणाल पाटील यांच्यासोबत तालुका कृषी अधिकारी व्ही. आर. प्रकाश, मंडळ कृषी अधिकारी पी.जे. पाटील, कृषी पर्यवेक्षक आर. व्ही. बोरसे, कृषी सहाय्यक चेतन शिंदे, कृषी सहाय्यक किरण देवरे तसेच महसूल व कृषी विभागातील कर्मचारी, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे, पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे, तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक सुडके, सरपंच गायत्री जयस्वाल, दिलीप बिरारी, नारायण बोढरे, योगेश गवळे, बाळू आनंदा पाटील,कृऊबा प्रशासक झुलाल पाटील,नेर प.स. सदस्य गणेश जयस्वाल,शरदराव सोनवणे,जगन्नाथ सोनवणे,आनंद पाटील,मांगू मोरे,दिलीप सोनवणे,दिलीप बिरारी,दयाराम पारधी, बळीराम चौधरी,सुरज खलाणे,महेश जयस्वाल,आसाराम जाधव,सतिष बोढरे,मुकुंद साकरे, शरद दादा सोनवणे,सुरज खलाणे,बदरू टेलर,सोमनाथ बागूल,पोपट शिंदे, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Close