जळगाव जिल्हापारोळा-एरंडोल

एरंडोल शहरात कोरोना लसीकरण जनजागृती माध्यमातून पोळा साजरा

एरंडोल शहरात कोरोना लसीकरण जनजागृती माध्यमातून पोळा साजरा

  • एरंडोल दि – ०७/०९/२०२१ – (प्रतिनिधी ) – येथे दरवर्षी पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो परंतु गेल्या वर्षी कोरोना चे संकट असल्याने तो साजरा होऊ शकला नाही.एरंडोल येथे बहुतांश शेतकरी वर्ग आहे.त्यामुळे याठिकाणी पोळा मोठ्या उत्साहात साजरा होतो.यावर्षी कोरोना काही अंशी आटोक्यात आला असल्याने पोळा सण साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
    शहरातील नागरिकांनी घरीच बैलांची पूजा करुन पोळा सण साजरा केला.यावेळी त्यांनी बैलांना विशिष्ट प्रकारे सजवले होते.त्यांनी बैलांच्या अंगावर कोरोना जनजागृतीचे बॅनर लावले होते व त्यातुन त्यांनी कोरोना संपलेला नसुन तिसरी लाट येऊ न देण्यासाठी काय करावे व एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे सरकारने जास्तीत जास्त डोस उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार प्रदर्शन चे बॅनर व असे अजुन अनेक बॅनर बैलांच्या अंगावर टाकून जनजागृती केली आहे.तसेच शहरात काही ठिकाणी पोळ्याचा उत्साह दिसुन आला.मात्र आधी सारख्या बैलांच्या झुंडी मात्र यावेळेस दिसत नव्हत्या.बैलपोळा देखील गेल्या दोन वर्षांपासून फोडण्यात आला नाही.

Related Articles

Close