जळगाव जिल्हापारोळा-एरंडोल

पोळ्याच्या दिवशी बैल धुण्यासाठी तलावावर गेलेल्या पंधरा वर्षे बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू

पोळ्याच्या दिवशी बैल धुण्यासाठी तलावावर गेलेल्या पंधरा वर्षे बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू
एरंडोल: तालुक्यातील खर्ची बुद्रुक येथे सागर ज्ञानेश्वर माळी वय १५ वर्ष हा बालक पवठाने तलावावर पोळ्याच्या दिवशी सकाळी बैल धुण्यासाठी गेला असता बैल धुणे झाल्यावर सागर पोहायला लागला गाळात पाय फसल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला .
हि घटना पोळ्याच्या दिवशी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली त्याच्यासोबत गेलेल्या मुलांनी व ग्रामस्थांनी आरडाओरड केली त्यामुळे ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेतली.व मृतदेह बाहेर काढण्यात आला व जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असताना खोटे नगर जवळ त्याचा मृत्यू झाला.

      या घटनेमुळे खर्ची बुद्रुक गावावर शोककळा पसरली

मृत सागर हा इयत्ता आठवी जळगाव येथील आर आर विद्यालयात शिकत होता त्याच्या पश्चात थोरली बहीण एक लहान भाऊ आई व वडील असा परिवार आहे.

Related Articles

Close