जळगाव जिल्हापाचोरा-भडगाव

ग्रामपंचायतीवर वाढला वीस लाख रुपये व्याजाचा भार.गाळे बांधकामात ठेकेदाराने केला भ्रष्टाचार,पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील प्रकार.

पाचोरा तालुक्यातील लोहारी बुद्रुक ग्रामपंचायत तर्फे सुशिक्षित बेरोजगारांना आपले उद्योग व व्यवसाय सुरु करण्यासाठी गाळे उपलब्ध करून हे गाळे भाडेतत्वावर देऊन ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर पडेल तसेच बेरोजगारांना उद्योगधंदे करण्यासाठी हक्काची जागा व संधी मिळेल असा चांगला हेतू डोळ्यासमोर ठेवून सन २०१६ ते सन २०१७ या कालावधीत (डी.व्ही.डी.एफ.) जिल्हा ग्रामीण विकास निधी (फंड) या योजनेअंतर्गत गाळे बांधकाम करण्यासाठी चाळीस लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आले आहे.

परंतु मंजुरी मिळाल्यानंतर पाचोरा येथील एका नामवंत ठेकेदाराला या गाळ्यांचे बांधकामासाठीचा ठेका दिल्यावर संबंधित ठेकेदाराने बांधकामाचे सुरवातीला चांगला प्रतिसाद देत त्यावेळी असलेले सरपंच व ग्रामसेवक यांचा विश्वास संपादन करुन निधी पदरात पाडून घेतला मात्र नंतर बांधकाम निकृष्ट दर्जाचे करत सन २०२१ पर्यंतचा कालावधी निघून गेल्यावर सुध्दा अध्याप पावेतो या गाळ्यांचे बांधकाम पूर्ण न केल्यामुळे हे गाळे अपूर्ण अवस्थेत तसेच पडले आहेत.

या ठेकेदाराच्या मनमानी वागणूकीमुळे ग्रामपंचायतीने जिल्हा ग्रामीण विकास निधी योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जावर आजपर्यंत वीस लाख रुपये व्याज वाढले असून ग्रामपंचायतीला नहाकच भू दंड सहन करावा लागत आहे. तसेच या गाळ्यांचे बांधकाम सुरु झाल्यावर आपल्याला व्यवसायासाठी गाळे (दुकाने) उपलब्ध होतील असे स्वप्न उराशी बाळगून लोहारी येथील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या परंतु ठेकेदाराची मनमानी सोबतच सत्ताधारी सरपंच व ग्रामसेवकांची हातमिळवणी झाल्या कारणाने या गाळ्यांच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप लोहारीचे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केला आहे.

या गाळ्यांचे बंद कामात झालेला भ्रष्टाचारामुळे व दिरंगाईमुळे जिल्हा ग्रामीण विकास निधीतून घेतलेल्या चाळीस लाख मुद्दल कर्जावर वीस लाख रुपयांचे व्याज वाढले आहे. म्हणून हे वाढीव व्याज सन २०१६ व सन २०१७ या कालावधीत सत्तेवर असलेले ग्रामपंचायतीचे सत्ताधारी सरपंच व ग्रामसेवक यांना जबाबदार धरून व्याजाचे वीस लाख रुपये ठेकेदार सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून वसूल करावे अशी मागणी होत असून असे न झाल्यास लवकरच आंदोलन छेडणार असून न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे सांगितले.

Related Articles

Close