क्राईम जगतजळगाव जिल्हा

फैजपूर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अनिल महाजन ५०० रूपयेची लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले

फैजपूर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अनिल महाजन ५०० रूपयेची लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले

सावदा (प्रतिनिधी दिलिप चांदेलकर ) :- सावदा :- जळगांव जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेल्या फैजपूर पोलीस ठाण्यात गोपनीय विभागात नाईक म्हणून कर्तव्यावर असलेले अनिल महाजन दारूचा व्यवसाय नियमित ठेवण्यासाठी दारू विक्रेत्याकडून मात्र पाचशे रुपयाची लाच घेताना रंगेहात दि.३ सप्टेंबर २०२१ रोजी जळगांव येथील एसीबीच्या जाळ्यात अडकले यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की तक्रारदार यांची दारू विक्रीचा व्यवसाय असून सदरील व्यवसाय हा फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियमित चालवण्या कामे दर महिन्याला ५०० रूपये दारू विक्रेत्यांनी द्यावे अशी मागणी पोलीस ठाण्यात गोपनीय विभागातील पोलीस नाईक अनिल महाजन यांनी त्यांच्याकडे केली होती. सबक तक्रारदारांनी जळगांव येथील लाच लुचपत विभागात जाऊन याविषयी तक्रार दाखल केली असता तक्रारीची दखल घेऊन त्याची पडताळणी साठी आज दुपारी दोन वाजता थेट सापळा रचून मोठ्या शिताफीने संशयित आरोपी पोलीस नाईक अनिल महाजन यांनी तक्रार दाराकडून पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात एसीबीने त्याला पकडले आहे. सदरील कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकाऱ्यांनी हा सापळा यशस्वी केला आहे.

तसेच देशभरात अशा घटना दिवसाआड घडत असल्याने आणि लाच स्वीकारताना शासनाच्या विभागातील अधिकारी व कर्मचारी अडकत असतील तर याला म्हणावे तरी काय? यापेक्षा इतरांनी सदरील घटनेपासून बोध घेणे गरजेचे नाही का? सदरील घटनेत एका गोपनीय विभागात कार्यरत असलेला पोलीस नाईक यांनी पाचशे रुपयाची लाच अवैध दारू सारखा व्यवसायला नियमित चालवण्यास प्रोत्साहन देणे म्हणजे सद्रक्षणाय खलनिग्रहणाय याचा अर्थ थेट विसल्याने सदरील परिणाम समोर आलेले दिसत आहे. हे मात्र खरे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close