महाराष्ट्र

नियोजनबद्ध लसीकरण, मोहाडी प्रा. आ. केंद्राचे कौतुक

नियोजनबद्ध लसीकरण, मोहाडी प्रा. आ. केंद्राचे कौतुक


दिंडोरी प्रतिनिधी / पोपट गवारी:- मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चालू असलेल्या नियोजनबद्ध लसीकरणाने सर्वांना समान न्याय देण्यात येत असल्याने खडकसुकेणे ग्रामस्थांनी मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ सी.एस.लोणे यांचे विशेष आभार मानले.सध्या करोनाची धास्ती सर्व स्तरातील नागरीकांनी घेतले असून त्यापासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय समोर दिसत असल्याने नागरिकांनी एकच झुंबड प्राथमिक आरोग्य केंद्रांवर केली होती.

– मधुकर फुगट, ग्रामपंचायत सदस्य, खडकसुकेणे.

लसीचा येणारा साठा व नागरीकांची वाढलेली गर्दी बघता सर्व गावांना समान न्याय मिळणे कठीण झाले होते. सर्व मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व गावांना समान न्याय मिळवा याबाबत मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ सी.एस.लोणे यांच्याशी सर्व गाव प्रमुखांनी चर्चा केली असता त्यांनी लस उपलब्धतेनुसार प्रत्येक उपकेंद्रात लस उपलब्ध करून देत कार्यक्षेत्रातील सर्व गावांना समान न्याय मिळवून देण्यासाठी चांगला उपक्रम राबवून एक आदर्श कामाची पावती दिली. प्रत्येक उपकेंद्राला उपलब्धतेनुसार क्रमाक्रमाने लस उपलब्ध करून स्थानिक नागरिकांना लसीकरणाची उत्तमरीत्या नियोजन केल्याबद्दल सर्व गांवाच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ सी.एस.लोणे यांच्याबरोबरच आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका- सेवक , आशा गटप्रवर्तक व कार्यकर्ती यांचे विशेष कौतुक होत असुन खडकसुकेणेचे ग्रामपंचायत सदस्य मधुकर फुगट यांनी सर्व गावांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र मोहाडीचे आभार मानले.
१) मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातून कार्यक्षेत्रातील सर्व उपकेंद्राला उपलब्धतेनुसार  क्रमाक्रमाने लसीकरणाचे नियोजन करून अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने नागरिकांना लस उपलब्ध करून देत असून यामुळे सर्व लहान मोठ्या गावांना समान न्याय मिळत असून यासाठी नियोजन करून ते व्यवस्थित पार पाडण्यासाठी मेहनत घेणारे वैद्यकीय अधिकारी डॉ लोणे,तसेच सर्व कर्मचारी टिमचे मी सर्व नागरीकांच्या वतीने आभार मानतो व नागरीकांनीही त्यांना आवश्यक सहकार्य करावे असे आवाहन करतो.- मधुकर फुगट, ग्रामपंचायत सदस्य, खडकसुकेणे.

Related Articles

Close