जळगाव जिल्हारावेर-यावल

कर्तव्य बजावत असताना कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सावदा नगर परिषदेतर्फे कामकाज बंद ठेवून जाहीर निषेध

सावदा प्रतिनिधि – काल दिनांक 30/08/2021 रोजी ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती. कल्पिता पिंपळे या आपले कर्तव्य बजावत असताना एका माथेफिरू कडून त्यांच्यावर भ्याड हल्ला झाला व यात त्यांची हाताची बोटे कापली गेली,तसेच डोक्यास देखील मोठी जखम झाली आहे. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर झालेला हा भ्याड हल्ला अत्यंत संतापजनक आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीचे मुजोर लोक जेंव्हा कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करतात,तेंव्हा अश्या प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते त्यामुळे अश्या प्रकारच्या हल्ल्याचा “संघटित निषेध” करणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच यावरील उपाय आहे.

हा केवळ एका अधिकाऱ्यावरील हल्ला नसून असे भ्याड हल्ले संपूर्ण नोकरशाहीस च जायबंदी करतात

त्यामुळे या घटनेचा निषेध म्हणून आज दिनांक 31/08/2021 रोजी “सावदा नगरपरिषदेचे” संपूर्ण कामकाज कडकडीत रित्या बंद करण्यात येत आहे.

किशोर चव्हाण
मुख्याधिकारी,
सावदा नगरपरिषद

Related Articles

Close