अमळनेर-चोपडाजळगाव जिल्हा

अमळगाव शिवारात अज्ञात वन्य प्राण्याने पाडला आठ शेळ्यांचा फडशा

अमळगाव शिवारात अज्ञात वन्य प्राण्याने पाडला आठ शेळ्यांचा फडशा.


अमळगाव ता अमळनेर – येथील तरुण शेतकरी वैभव पुरुषोत्तम चौधरी यांचा अमळगाव शिवारातील गट न 319/1 मधील शेतात झोपडीत बांधलेल्या आठ शेळ्यांचा अज्ञात वन्य प्राण्याने फडशा पाडला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की येथील तरुण शेतकरी वैभव चौधरी हे दुपारी चार वाजेच्या सुमारास आपल्या शेतात बांधलेल्या शेळ्यांना चारापाणी करण्यासाठी शेतात गेले असता त्यांनी सर्व आठही शेळ्यांचा फडशा पडलेला पहिला घटनेची माहिती तहसीलदार मिलिंकुमार वाघ यांना देताच त्यांचा मार्गदर्शनाखाली मंडलाधिकारी एन आय कट्यारे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला तर पशू वैद्यकीय अधिकारी डॉ मुकेश पाटील यांनी शवविच्छेदन केले .
अमळगाव परिसर आधीच दुष्काळाच्या झळा सोसत असताना तरुण शेतकऱ्याचा पशुधनाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून इतर शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Related Articles

Close