उज्वला देशमुख गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

0 0
Read Time:2 Minute, 25 Second

उज्वला देशमुख गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित
येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका उज्वला देशमुख – महाजन यांना नुकतेच शिक्षक भारती व सहयोगी संघटनांच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्कारा बद्दल कन्या विद्यालयातर्फे त्यांचे पुनश्च अभिनंदन करण्यात आले.

शिक्षक भारती, राष्ट्र सेवादल, लोकसंघर्ष मोर्चा व छात्रभारती या संघटनांतर्फे 25 ऑगस्ट रोजी गुणवंत शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. जळगाव येथील कांताई सभागृहात शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते श्रीमती उज्वला देशमुख महाजन यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे अध्यक्षस्थानी होत्या.

या कार्यक्रमाला संघटनेचे राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे, राजेंद्र दिघे, साहेबराव कुंटे, अशोक पवार, सुनील पाटील, विजय सोनवणे, युवराज पाटील, दिलीप आर्डे, दीपक आर्डे, चंद्रकांत देशमुख, सचिन बनसोडे, करीम सालार, भारती गाला, भरत शेलार, आप्पासाहेब पाटील, रणधीर इंगळे, के. के. पाटील, संजय वानखेडे, अमोल वाणी, के.के. अहिरे, अश्फाक खाटीक आदी मान्यवर उपस्थित होते.

येथील कन्या विद्यालय तर्फे ज्येष्ठ शिक्षिका कुंदा पाटील- शिंदे प्रा. प्रतिमा परदेशी यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन उज्वला देशमुख यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी विद्यालयातील पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %