पाचोरा खडकदेवळा येथील रहिवाशी ग्रामपंच्यात विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २६ जानेवारी रोजी उपोषणास बसणार !पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यातील खडकडेवळा येथील रहिवाशी गोकुळ उत्तम देवरे यांनी गेल्या २०१६ पासून म्हणजे तब्ब्ल ८ वर्षांपासून ग्रामपंचायत अतिक्रमणास प्रोहत्सान देत आहे . म्हणून ग्रामपंच्यात विरोधात तसेच तत्कालीन ग्रामसेवकांविरोधात लढा पुकारला असून अतिक्रमणास चालना देणाऱ्या सरपंच सभासद यांना ३९/१ प्रमाणे अपात्र घोषित करावे तसेच ग्रामसेवक यांना तत्काळ निलंबन करावे.खडकदेवळा येथील अर्जामध्ये दिलेल्या दोन व्यक्तीचे अतिक्रमण काढणे.तसेच संदर्भीय यादी क्रमांक १ ते ५९ मधील पेज नंबर १ त १३९ याप्रमाणे दिलेल्या विषयास अनुसरून न्याय मागणीसाठी तसेच वरील विषयाचा अहवाल मागवून कारवाई व्हावी याकरिता दिनांक २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन गोकुळ उत्तम देवरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे .
तारखेडा येथे २७ लाखांचा अवैध गुटखा जप्त पाचोरा सह परिसरातील व्यापा-यांनी घेतला धसका !
पाचोरा - पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथे गुटखा जप्त करून पोलिसांनी मोठी कारवाई केली खरी परंतु अजूनही मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा...