मोकाट पशुधन धारकांनी आपल्या पशुधनाकडे लक्ष्य ठेवावे : पो.स्टे.दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील
भडगांव (प्रतिनिधी) : शहरात बरेच पशुधन धारक आपली गुरेढोरे मोकाट सोडून देतात. सायंकाळी परत येतात की नाही ही दक्षता घेत नाहीत. काल विद्यानगर परिसरात एका गाईने वासरास जन्म दिला. रात्र झाली तरी कोणी तपास केला नाही. परिसरातील सु.मा.पाटील विज्ञान महाविद्यायाच्या शिक्षकांसह रहिवाशांनी पो.स्टे.दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील यांचेशी संपर्क केला. प्रसंगावधान राखून त्यांनी शहरातील सोशल मिडियावर माहिती दिली. परंतु पशुधनधारक न आल्याने रात्री सदर गोमाता व वासराची काळजी घेण्यासाठी पाटील कुशन्स संचालक गणेश पाटील यांचेकडे पाठविले. आज पशुधनधारक यशवंतनगरचे अमोल दिलीप महाजन यांचे ताब्यात गोमाता व वासराची योजना पाटील यांनी सहृदयपुर्वक पूजा आरती करून सुपूर्त केले. आपल्या मोकाट पशुधनावर वेळीच लक्ष्य ठेवा तसेच दक्षता काळजी घेण्याचे आवाहन योजना पाटील यांनी केले आहे.
तारखेडा येथे २७ लाखांचा अवैध गुटखा जप्त पाचोरा सह परिसरातील व्यापा-यांनी घेतला धसका !
पाचोरा - पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथे गुटखा जप्त करून पोलिसांनी मोठी कारवाई केली खरी परंतु अजूनही मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा...