सोनसाखळी चोर महिलेला शिताफीने पकडण्यात पोलिसांना यश

0 42

सोनसाखळी चोर महिलेला शिताफीने पकडण्यात पोलिसांना यश ! पाच दिवसाची मिळाली पोलीस कस्टडी

अमळनेर शहरप्रतिनिधी, येथील बसस्थानकात सोनसाखळी चोर महिलेला रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश मिळाले.

सविस्तर वृत्त असे की, अमळनेर बसस्थानकात दुपारच्या सुमारास चोपडा-नाशिक बस मध्ये चढतांना गर्दीचा फायदा उचलत एका सोनसाखळी चोर महिला हीने एका महिला प्रवासी च्या गळ्यातील सोन्याची 2 तोळेची मंगलपोत लंपास करण्याच्या प्रयत्नात असतांना कर्तव्यावर असलेले सहा फौज निबां शिंदे यांच्या लक्षात येताच त्यानी महिलांप्रवाश्यांच्या मदतीने सदर महिला चोर हिस पकडून पोलीस ठाण्यात रवाना करण्यात आले. सदर चोरीचा प्रकार केवळ सतर्क असलेले पोलीस निबां शिंदे यांच्या चाणाक्ष नजरेने हेरल्याने विफल ठरला. शिंदे हे बसस्थानक येथे कर्तव्य बजावत असतांना चोरी नाहीच्या बरोबरीने होत असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या कामगिरी बाबत पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोउनि गंभीर शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले.दरम्यान या महिला विरुद्ध कल्पना तिसा या प्रवासी महिलेने दिलेल्या फिर्यादी वरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असता सदर चोर महिलेला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ दिवसाची पोलिस कस्टडी सुनावली आहे.पुढील तपास पोना अलोक साबळे हे करीत आहे.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.