newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

गिरीश कुबेर लिखित रीनैसंस द स्टेट पुस्तकावर बंदी घालण्याची शंभुप्रेमी संघटनाची मागणी

- Advertisement -

- Advertisement -

चाळीसगाव प्रतिनिधी – रीनैसंस द स्टेट या पुस्तकातुन गिरीश कुबेर या लेखकाने छत्रपती संभाजी महाराज व मातोश्री सोयराबाई यांच्या विषयी बदनामी कारक लेखन केल्याने समस्त महाराष्ट्रातील शंभुप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याने लेखक गिरीश कुबेर व प्रकाशक हार्पर कोलिंस यांचा शंभुप्रेमी संघटनांच्या वतीने निषेध करीत . रीनैसंस द स्टेट या पुस्तकावर बंदी घालून महाराष्ट्रात झालेले पुस्तकाचे वितरण थांबवून वादग्रस्त पुस्तक वितरकांनी शासन दरबारी जमा करण्याची मागणी शंभुप्रेमी संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री यांना द्वारा चाळीसगाव तहसीलदार यांच्या कडे दि २७ रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज साहित्यक होते .संस्कृत भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. चारीत्र्यसंपन्न व स्वराज्य निष्ठीत असणाऱ्या संभाजी महाराजांची बदनामी करून चारीत्र्यहनन करण्याच काम आजही कथा,कांदबऱ्या,मालिका ,पुस्तकातुन वेळोवेळी होत आहे.रीनैसंस द स्टेट या पुस्तकातुन गिरीश कुबेर या लेखकाने छत्रपती संभाजी महाराज व मातोश्री सोयराबाई यांच्या विषयी बदनामी कारक लेखन करून समस्त शंभुप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत.तसेच शाहू महाराजांकडे दुरदृष्टीचा अभाव असणारे व कर्तृत्व नसणारे छत्रपती होते.तर महादजी शिंदेना तर विश्वासघातकी दगाबाज होते असे आक्षेपार्ह लिखाण गिरीश कुबेर याने पुस्तकात केले आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचे मावळे म्हणून आम्ही कदापि महापुरुषांची बदनामी खपवून घेणार नाही.कुबेर हे एका दैनिकाचे संपादक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी बिनबुडाचे लिखाण करतात या मागे त्यांचा हेतू काय . याची ही चौकशी राज्य शासनाने करावी. तसेच संवेदनशील विषयामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी लवकरात लवकर लक्ष घालून रीनैसंस द स्टेट या पुस्तकावर बंदी घालून महाराष्ट्रात झालेले पुस्तकाचे वितरण थांबवून वादग्रस्त पुस्तक वितरकांनी शासन दरबारी जमा करण्याची मागणी शंभुप्रेमी संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री यांना द्वारा चाळीसगाव तहसीलदार यांच्या कडे दि २७ रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनावर गणेश पवार, पंकज रणदिवे, अरुण पाटील, खुशाल पाटील, मुकुंद पाटील ,योगेश पाटील, कुशल देशमुख, मनोज पाटील ,राहुल मस्के, दीपक देशमुख ,प्रमोद वाघ, छोटू अहिरे, किशोर पाटील आदींच्या सह्या आहेत

- Advertisement -