newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

अल्पावधीत संपूर्ण देशात पाचोरा चे नाव कोरणारी अर्णीत मार्कटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे सीएमडी तरुण उद्योजक व रजनीकांत चित्ते यांचे सर्वत्र अभिनंदन

- Advertisement -

अल्पावधीत संपूर्ण देशात पाचोरा चे नाव कोरणारी अर्णीत मार्कटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे सीएमडी तरुण उद्योजक व रजनीकांत चित्ते यांचे सर्वत्र अभिनंदन

यांच्या विषयी थोडक्यात जाणून घेऊयात नवं उद्योजकांना प्रेरना मिळावी हा यामागील उद्देश

पाचोरा येथील तरुण उद्योजक व गेल्या ३० वर्षांपासून आपल्या फोटोग्राफी व्यवसायांच्या माध्यमातून आपली प्रगती साधत यानंतर तीन वर्षापासून आर्णीत मार्कटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे सीएमडी पद सांभाळत या कंपनीच्या माध्यमातून इंटरनॅशनल ट्रेडिंग चा बिजनेस करून कंपनीचे व पाचोरा शहराचे नाव भारतभर पोचविले त्यानंतर दर्जेदार लाकडी घाणा तेलाचे महाराष्ट्रभर प्रचार व प्रसार करत आहेत फार्मिंग , बिल्डिंग कन्स्ट्रक्शन , वेअर हाऊस , सिमेंट प्रोडक्ट , ऍग्री व टुरिझम अशा विविध संकल्पना सध्या चालवत आहेत व काही भविष्यात लवकरच सुरू करणार आहेत कंपनीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांना अन्य अन्नदान गोरगरीब लोकांना थंडीच्या दिवसात कंबल वाटप तसेच कुस्तीगिरांसाठी दर महिन्याला कच्ची घाणे सरसो तेल मोफत देऊन त्यांना प्रोत्साहन देत आपल्या हातून होणारी मदत ते करत असतात रजनीकांत त्यांचे वडीलांचे म्हणजे अशोक चित्ते यांचा फोटोग्राफरचा व्यवसाय खूप छान पद्धतीने सुरू होता आणि रजनीकांत हे यात मन लावून वडिलांना मदत करत होते .

त्यामुळे व्यवसाय अजून जोमाने चालत होता पण रजनीकांत यांना व्यवसाय करत असताना आपण काहीतरी वेगळे करून आपली नवीन ओळख निर्माण व्हावी उद्योग जगतात आपले नाव व्हावे म्हणून नवीन उद्योग सुरू करायचा विचार त्यांच्या मनात आला अर्णीत च्या माध्यमातून सुरुवात केली. हळूहळू सुरुवात करत आज खूप उंच भरारी घेत आहेत आपल्या कामाशी प्रामाणिक राहावून आपणही समाजाचे काही देणे लागतो .

- Advertisement -

याप्रमाणे सामाजिक हातभार लावत गरजवंताला आपल्या परीने ते मदत करीत आहेत . आणि मदतीला तत्पर असतात आणि भविष्यात आणि अर्णीत मार्कटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पाचोरा च्या माध्यमातून तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे . आज त्यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधत त्यांचा जन्मदिनी त्यांच्या जुन्या जन्मभूमीत म्हणजे कृष्णापुरी भागातील रहिवाशांसाठी आपला घाणा तेलाच्या प्रकल्पातून सवलतीच्या दरात ज्या किमतीत तयार होईल त्या ककिंमतीत शेंगदाणा तेल उपलब्ध करून दिले आहे . ही योजना कृष्णापुरी ग्रामस्थांसाठी कायमस्वरूपी राहील असे त्यांनी बोलून दाखविले .


परत रजनीकांत यांना न्यूज झेप इंडिया परिवारातर्फे वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा

- Advertisement -