newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

डॉ संतोष पाटील कोरोणा योद्धा पुरस्काराने सन्मानित

- Advertisement -

डॉ संतोष पाटील कोरोणा योद्धा पुरस्काराने सन्मानित
पाचोरा – सुप्रसिध्द व्याख्याते व लेखक डॉ संतोष पाटील गोराडखेडेकर यांना प्रायव्हेट कर्मचारी कल्याण असोसिएशन अॅन्ड एच डी एस दिल्ली यांच्यातर्फे कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . डॉ पाटील हे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोकरदन येथे कार्यरत शिक्षक आहेत . कोरोना काळात पाटिल यांनी लोकांच्या सकारात्मक भावना जागवण्यासाठी व या भयावह परिस्थितीमध्ये आशावादी किरण निर्माण करण्यासाठी विभिन्न दैनिक वृत्तपत्रात लेख लिहिण्याचे कार्य केले .

- Advertisement -

यात त्यांनी कोरोना काळ व मुलांचे शिक्षण , शेतकरी बांधव विद्यार्थी व्यापारी व सर्व समाजाला मार्गदर्शक व मदत होईल अशा लेखांचे लिखाण केले . या काळात त्यांनी आतापर्यंत पंचवीस विभिन्न विषयावरती लेख लिहिले त्याचबरोबर त्यांनी समाजातील गोरगरीब घटकांना घरी तयार करून भोजन वाटपाचे कार्य केले . या कार्यात त्यांना त्यांच्या सौभाग्यवती वंदना पाटील यांची फार मोठी साथ मिळाली . याच त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . ऑनलाईन पध्दतीने त्यांचा सत्कार करण्यात आला . संस्थेचे महासचिव शेख उबेद शेख करामत यांच्यातर्फे व इतर मान्यवर यांच्यातर्फे ऑनलाईन पध्दतीने शाल श्रीफळ व ई सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला . याप्रसंगी त्यांनी हा पुरस्कार मला नसून माझ्या विभिन्न लेखांना प्रसिध्दी देणार्‍या पत्रकार बांधवांचा व संपादकांचा आहे असे बोलून दाखवले व त्या सर्वांचे आभार मानले . याबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे

- Advertisement -