newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांनास्मृतीदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

- Advertisement -

माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांनास्मृतीदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन !जळगाव, (जिमाका) दि. 21 – माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना स्मृतीदिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी अभिवादन केले आहे. दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी निवडणूक तुकाराम हुळवले, तहसिलदार सुरेश थोरात, नायब तहसिलदार रविंद्र मोरे आदि उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरातील शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेतली.

- Advertisement -

- Advertisement -