newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत सव्वा लाखापेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात !

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत सव्वा लाखापेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात !

- Advertisement -

जळगाव- (प्रतिनिधी ) – जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले 91.54 टक्क्यांवर•मृत्युदर आला 1.79 टक्क्यांपर्यत खाली•जिल्ह्यात आजपर्यंत 10 लाख 65 हजार 838 संशयितांची केली कोरोना चाचणी•जिल्ह्यात 3 लाख 38 हजार 841 नागरीकांनी पहिला तर 1 लाख 13 हजार 247 जणांनी घेतला दुसरा डोस जळगाव, (जिमाका) दि. 21 – कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजना व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सतत वाढत असून ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनामुळे बाधित झालेल्या 1 लाख 37 हजार 136 रुग्णांपैकी 1 लाख 25 हजार 533 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात 9 हजार 143 ॲक्टीव्ह रुग्ण उपचार घेत असून जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 460 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. जिल्ह्यात बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.54 टक्क्यांवर पोहोचले असून जिल्ह्याचा मृत्युदर 1.79 टक्क्यांपर्यत खाली आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित रुग्णांचा शोध घेऊन कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्या व्यक्तींचे स्वॅब घेऊन कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे बाधित रुग्णांचा लवकर शोध लागून त्यांचेवर वेळेत उपचार होत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून मृत्युदर रोखण्यातही आरोग्य यंत्रणेला यश येत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 10 लाख 65 हजार 838 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी कोरोना विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यापैकी 1 लाख 37 हजार 136 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत तर 9 लाख 25 हजार 270 अहवाल निगेटिव्ह आले असून सध्या 1 हजार 635 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात सध्या 6 हजार 871 रुग्ण होम क्वारंटाईन असून 281 रुग्ण विलगीकरण कक्षात आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 9 हजार 143 रुग्णांपैकी 7 हजार 421 रुग्ण लक्षणे नसलेले तर 1 हजार 722 रुग्ण हे लक्षणे असलेले आहेत, अशी माहिती कोविड-19 चे नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत 4 लाख 52 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील नागरीकांचे लसीकरण करण्यात येत असून यासाठी जिल्हाभरात लसीकरण केंद्र सुरु केले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 38 हजार 841 नागरीकांना कोरोनाचा पहिला डोस तर 1 लाख 13 हजार 247 नागरीकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. लसीच्या उपलब्धतेनुसार नागरीकांचे लसीकरण सुरु असून सध्या 45 वर्षावरील नागरीकांचे लसीकरण करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोगय अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी कळविले आहे. तालुकानिहाय बरे झालेले रुग्ण जळगाव शहर-31014, जळगाव ग्रामीण-4923, भुसावळ-11327, अमळनेर-8495, चोपडा-13377, पाचोरा-4267, भडगाव-3359, धरणगाव-4980, यावल-4103, एरंडोल-6100, जामनेर-8132, रावेर-5328, पारोळा-4454, चाळीसगाव-7654, मुक्ताईनगर-4369, बोदवड-2599 व इतर जिल्ह्यातील-1052 असे एकूण 1 लाख 25 हजार 5336 रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत.तालुकानिहाय उपचार घेत असलेले रुग्ण जळगाव शहर-804, जळगाव ग्रामीण-316, भुसावळ-1032, अमळनेर-386, चोपडा-830, पाचोरा-450, भडगाव-84, धरणगाव-315, यावल-377, एरंडोल-389, जामनेर-792, रावेर-609, पारोळा-243, चाळीसगाव-999, मुक्ताईनगर-890, बोदवड-490 व इतर जिल्ह्यातील-137 असे एकूण 9 हजार 143 रुग्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.तालुकानिहाय बाधित झालेले रुग्ण जळगाव शहर-32374, जळगाव ग्रामीण-5377, भुसावळ-12682, अमळनेर-9022, चोपडा-14367, पाचोरा-4846, भडगाव-3517, धरणगाव-5399, यावल-4610, एरंडोल-6595, जामनेर-9069, रावेर-6106, पारोळा-4741, चाळीसगाव-8763, मुक्ताईनगर-5339, बोदवड-3135 व इतर जिल्ह्यातील-1189 असे एकूण 1 लाख 37 हजार 136 रुग्ण आतापर्यंत बाधित झाले आहेत.तालुकानिहाय एकूण मृत्यु जळगाव शहर-556, जळगाव ग्रामीण-138, भुसावळ-323, अमळनेर-141, चोपडा-160, पाचोरा-129, भडगाव-74, धरणगाव-104, यावल-130, एरंडोल-106, जामनेर-145, रावेर-169, पारोळा-44, चाळीसगाव-115, मुक्ताईनगर-80, बोदवड-46 असे एकूण 2 हजार 460 बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचे प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

- Advertisement -