newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे राष्टीय डेंगू दिवस साजरा !

- Advertisement -

पाचोरा- (संजय पाटील)- पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे राष्टीय डेंगू दिवस साजरा करण्यात आला
सर्व शहर वासी व ग्रामीण जनतेला आवाहन करण्यात येते की
कोरोना सोबतच डेंगू आजारीची काळजी घेणे गरजेचे आहे असे आहावन जिल्हा हिवताप अधिकारी श्रीमती अपर्णा पाटील व पाचोरा ग्रामीण रुग्णालय चे वैद्यकीय अधीक्षक डॉ अमित साळुंखे यांनी केले आहे ..
राष्ट्रीय डेंगू दिवस १६ मे २०२१ पाचोरा ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे साजरा करण्यात आला असता नागरिकांनी खालील काळजी घेणे आवश्यक आहे
आपल्या घरातील पाण्याची भांडी, रांजण , हौद एकदा रिकामे करणे . घासून पुसून स्वच्छ करून ठेवणे आपल्या घराचं परिसर स्वच्छ करून ठेवणे गरजेचे आहे. पाण्याचं भांडी झाकुन ठेवावे जेणे करुन डास आळी तयार होणार नाही . ताप आल्यास रक्ताची तपासणी करून घ्यावी. मच्छर दानीचा वापर करावा
नागरिकांना कोरडा दिवस पाळावा
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री जी एस काकडे आरोग्य सेवक पाचोरा तेसेच सर्व आरोग्य कर्मचारी ग्रामीण रुग्णालय पाचोरा हजर होते

- Advertisement -

🦟 डेंगू आजाराबाबत जनतेने घ्यावयाची काळजी 🦟
16 मे हा दिवस राष्ट्रीय डेंगू दिन म्हणून साजरा करण्यात येतो किटकजन्य रोग प्रतिबंधक कार्यक्रमांमध्ये आरोग्य व हिवताप विभागामार्फत किटकजन्य रोग प्रतिबंधक कार्यवाही नियमित करण्यात येत असते.
1) डेंग्यू ताप किंवा डेंगी ताप हाडमोडी ताप हा एक विषाणूजन्य आजार आहे
2) हा ताप डेंगू (DENV) या विषाणूमुळे होतो.
3) डेंगू हा आजार एडीस इजिप्तीताय डासाच्या चाव्यामुळे प्रसारित होतो.
ह्या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होते
4) संक्रमणात्मक डासाच्या चाव्या नंतर ५ ते ६ दिवसानंतर मनुष्याला हा आजार होतो.
5) या आजाराचे दोन प्रकार आहेत डेंग्यू ताप आणि डेंगू रक्त स्रावात्मक ताप (DHF) डेंगू रक्त स्रावात्मक ताप हा अधिक तीव्र स्वरुपाचा आजार असून त्यामुळे मृत्यु ओढवू शकतो.
प्रतिबंधात्मक उपाय योजना
1) डासांना आळा घालने हा एकमेव उपाय रोगाला पसरविण्यापासून थांबवू शकतो. घराच्या आजूबाजूला पाणी साठू न देणे वेळच्यावेळी साठलेले पाणी रिकामे करणे भारीत केलेले मच्छरदाण्या वापरणे अंगाला ओडोमास लावणे गुड नाईट वडी वापरावीत.
2) आपल्या घराभोवती पाणी साचू देऊ नका.
3) घरातील पाण्याचे सर्व साठे आपल्या सोयीनुसार आठवड्यातून एक वार निश्चित करून रिकामे करावे. या साठ्यातील आतील बाजू व तळ घासून पुसून कोरडे करून पुन्हा वापरणे पाण्याचे साठी घट्ट झाकणाने झाकून ठेवावेत.
4) अंगण व परिसरातील खड्डे बुजवावे त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी.
5) झोपताना पूर्ण अंगभर कपडे घालावे पांघरूण घेऊन झोपावे.
6) संध्याकाळी दारे-खिडक्या बंद कराव्यात खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात झोपतांना भारीत मच्छरदाणीचा वापर करावा.
*इमारतीच्या छतावरील पाणी साचू देऊ नये तसेच फुटके डबे, टाकाऊ टायर्स, मटकी इ ची वेळीच विल्हेवाट लावा संन्डासाच्या पाइपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा दर आठवड्याला नाल्यांमध्ये रॉकेल किंवा क्रुड ऑईल टाकावे कुलर फ्रीज फुलदाणी यातील पाणी नियमित बदलावे पक्षी गुरे यांना पिण्यासाठी ठेवलेले भांडी नियमित स्वच्छ करावे वरील दक्षता प्रत्येकाने घेतल्यास डासांची उत्पत्ती होणार नाही म्हणजे योग्य काळजी व योग्य वेळीच केलेला उपचार तुम्हाला होणाऱ्या आजारापासून दूर ठेवीन त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण होण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा हिवताप अधिकारी तसेच ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथील डॉक्टर अमित साळुंखे व सर्व आरोग्य कर्मचारी वर्ग यांनी केली आहे

- Advertisement -