newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

पाचोरा-भडगांव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवनियुक्त पदाधिकारी निवडीत विकास पाटील , अझर शेख,विजय पाटील यांची वर्णी .

- Advertisement -

पाचोरा – येथे दिनांक ०३ मार्च सोमवारी मा.आमदार आदरणीय दिलीपभाऊ वाघ यांचे निवासस्थानी कोरोना पार्श्वभूमिवर फिजिकल डिस्टेंट ठेऊन शासकीय नियमानुसार मा.आमदार दिलीपभाऊ वाघ यांचे अध्यक्षतेखाली व गटनेते मा.नानासाहेब संजय वाघ यांचे मार्गदर्शनाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाचोरा-भडगांव पदाधिकारी,कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली.

- Advertisement -

जिल्हाध्य्क्ष भैय्यासो.रविंद्र पाटील,महिला जिल्हाध्यक्षा वंदनाताई चौधरी,मा.आमदार मनीषदादा जैन,नगरसेविका सुचेताताई वाघ यांनी मार्गदर्शन केले.बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस नूतन पदाधिकारी निवड करण्यात आली. या निवडीत जिल्हा प्रवक्तापदी प्रा.मंगलाताई शिंदे,जिल्हा उपाध्यक्षपदी विजय कडू पाटील,पाचोरा तालुकाध्यक्ष विकास पाटील सर,पाचोरा शहराध्यक्ष अझहरभाई शेख,पाचोरा महिला तालुकाध्य्क्षपदी रेखाताई देवरे,पाचोरा महिला शहराध्यक्षपदी सुनीताताई देवरे,भडगांव महिला तालुकाध्य्क्षपदी रेखाताई पाटील यांची निवड करण्यात आली. पदधिकारींना मान्यवारांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले.सदर प्रसंगी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, पत्रकार बांधव उपस्थित होते.

- Advertisement -