पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील सुनंदाबाई समाधान भिल (२१) या महिलेने एकाच वेळी ३ मुलांना जन्म
भडगाव -प्रतिनिधि -(संजय शेवाळे)-पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील सुनंदाबाई समाधान भिल (२१) या महिलेने एकाच वेळी ३ मुलांना जन्म लोहारी ता पाचोरा तिन मुलांना दिला जन्म असून, महिलेसह तिन्ही बाळांची प्रकुती स्थिर असल्याची माहिती सदर महिलेची यशस्वी प्रसूती करणारे पाचोरा येथील सावनेरकर हॉस्पिटल चे डॉ. विजय वसंतराव पाटील यांनी सुक्ष्म्लोक न्यूजशी बोलतांना दिली आहे.
सदर महिलेचा पती हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो, तसेच घरची परिस्थिती साधारण असल्याने,सदरची महिला हि सप्टेंबर २०२२ मध्ये गर्भपात करण्यासाठी आली होती, परंतु डॉक्टरानी मदत करण्याचा निर्णय घेतला सदरची परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळून सदर महिलेची समजूत काढून, सदर महिलेस गर्भपात करण्यापासून प्रवृत्त केले, व सदर महिलेच्या गर्भपिशवीला दिनांक ११/१०/२०२२ रोजी टाके टाकले,त्यानंतर दिनांक १६/०१/२०२२ सदर महिलेस मोठ्या प्रमाणात त्रास होऊ लागल्याने, व पहिले बाळ आडवे असल्याने सिझेरियन करण्याचा निर्णय घेतला, व सावेनरकर हॉस्पिटल चे डॉ. विजय वसंतराव पाटील यांनी दुर्बीण द्वारे सर्जरी करून सदर महिलेची डिलेव्हरी केली, त्यावेळी, भूलतज्ञ डॉ. अमित साळुंखे, हे देखील उपस्थित होते,सदर मुलांची जन्म वेळ ही पहिला मुलगा ११.५९ AMवजन १.८kg, दुसरा मुलगा १२ PM वजन १.६kg, तिसर मुलगा १२.०१ PM वजन १.७ kg असे असून, सदर तिन्ही मुलांची व सदर महिलेची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर डॉक्टरांची टीम लक्ष ठेवून असून, येत्या एक दोन दिवसात सदर महिलेस डिस्चार्ज दिला जाणार असल्याची माहिती डॉ. विजय वसंतराव पाटील यांनी दिली असून, तसेच डॉ. विजय वसंतराव पाटील हे भडगाव तालुक्यातील अंजनविहीरे येथील रहिवाशी असून, भडगाव तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.