newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

२ मे रोजी सहजयोग ध्यान साधना ५१ वर्षे पूर्ती निमित्ताने विनामूल्य ऑनलाईन आत्मसाक्षात्कार आणि ध्यान कार्यक्रम

- Advertisement -

२ मे रोजी सहजयोग ध्यान साधना ५१ वर्षे पूर्ती निमित्ताने विनामूल्य ऑनलाईन आत्मसाक्षात्कार आणि ध्यान कार्यक्रम

पुणे – सहज योगाच्या प्रणेत्या श्रीमाताजी निर्मला देवी यांनी ५ मे १९७० रोजी ठाणे जिल्ह्याच्या सीमेजवळील नारगोल (गुजरात) येथे समुद्रकिनारी ध्यानस्थ अवस्थेत जाऊन सहस्रार चक्र भेदनाची आणि विनासायास आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याची पद्धत – सहजयोग ध्यान सुरु केली. या घटनेला ५१ वर्षे पूर्ण होत आहेत .
प्रत्येक मानवाला आत्मसाक्षात्कार प्राप्त होऊन जीवनात परिवर्तन यावे आणि जीवन आनंदी व्हावे हे श्री माताजींचे स्वप्न होते . त्या करिता त्या विश्वभर फिरल्या आणि सहजयोग ध्यान, भारतीय संस्कृती, कला, भारतीय जीवन पद्धती आणि दैवीय ज्ञाना चा प्रचार त्यांनी केला . या निमित्ताने सहजयोग संस्थेद्वारे रविवारी 2 मे रोजी सायं 5 वा learning sahajayoga या युट्युब चॅनेल द्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे असे आवाहन महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री स्वप्निल धायडे यांनी केले आहे . साधकांना घर बसल्या सहज ध्यान शिकविण्यासाठी दररोज सायं 5 वा learning sahajayoga या युट्युब चॅनेल द्वारे विनामूल्य कार्यशाळा 20 जून पर्यंत घेतल्या जाणार आहे . लॉकडाऊन च्या काळात लाखो साधकांनी लाभ घेतला आहे .

- Advertisement -

सदर कार्यक्रमासाठी विनामूल्य टोल फ्री क्रमांक 1800 2700 800 यावर रजिस्टर करावे असे आवाहन सहजयोग संस्थे द्वारे केले आहे.

- Advertisement -