newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहण समारंभ निमंत्रितांच्या उपस्थितीत होणार

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहण समारंभ निमंत्रितांच्या उपस्थितीत होणार जळगाव, (वृत्तसेवा) दि. 29 – सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 28 एप्रिल, 2021 रोजीच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्यात कोरोना साखळी तोडण्यासाठी (Break The Chain) व विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी यावर्षी राज्यात महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करणेबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे 1 मे, 2021 रोजी सकाळी 8.00 वाजता राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे. याठिकाणी केवळ पालकमंत्र्यांसह महापौर श्रीमती जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त सतीष कुलकर्णी आदि अधिकारी उपस्थित राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिन कार्यक्रम अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे निर्देश शासनाने दिलेले असल्यामुळे या कार्यक्रमास नागरीकांनी गर्दी करु नये. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

- Advertisement -

- Advertisement -