newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

माझ्या महाराष्ट्रासाठी मी रक्तदान करणार या संकल्पनेतून भडगाव येथे ७४ रक्तदात्यांचे रक्तदान

- Advertisement -

माझ्या महाराष्ट्रासाठी मी रक्तदान करणार या संकल्पनेतून भडगाव येथे ७४ रक्तदात्यांचे रक्तदान
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ग्रंथालय विभाग जळगाव यांचे वतिने भडगाव येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

प्रतिनिधी। भडगाव
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ग्रंथालय विभाग जळगाव च्या वतीने भडगाव येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात ७४ रक्तदात्यांचे रक्तदान केले.

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने ,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे आवाहनाने व प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचे सूचनेनुसार माजी पालक मंत्री जळगाव तथा राष्ट्रवादी चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ सतिष पाटील यांचे अध्यक्षते खाली ग्रंथालय विभाग प्रदेश अध्यक्ष श्री उमेशजी पाटील व प्रदेश समन्वयक सौ , रीताताई बाविस्कर यांचे प्रमुख उपस्थितीत भडगाव येथे ग्रंथालय विभागाचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील यांनी आज दि १५ रोजी भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते .

याप्रसंगी डॉ. सतीष पाटील यांनी उद्घाटन व मार्गदर्शन करताना म्हटले कि, ज्या ज्या वेळेस आपल्या राज्यावर संकटे आली त्या संकटाना सामोरे जाण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी धावून आली आहे . कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीवर कोणतेही राजकारण न करता सर्वांनी पक्षभेद विसरून या संकटाला सामोरे गेले पाहिजे . राष्ट्रवादी काँगेस पार्टी ग्रंथालय विभाग जळगाव या विभागाला शरदचंद्रजी पवार यांचे हस्ते चांगले काम करीत असल्याने , पुरस्कार मिळाला आहे . त्याबद्दल ग्रंथालय सेलचे अभिनंदन केले . डॉ पाटील पुढे म्हणाले कि ,पक्षाचे अध्यक्ष पवारसाहेब आहेत , त्यांचा आदेश हा सर्वोच्च असतो. ग्रंथालय सेलने , असेच सामाजिक भांदिलकी जोपासून समाजपयोगीकाम करीत राहावे तसेच भैय्यासाहेब पाटील यांनी आयोजित केलेलं रक्तदान शिबिराबाबतचे कामाचे कौतुक केले. तसेच यश,अपयश हे येत असते. खचून न जाता,पक्षाचे काम अधिक जोमाने करणेबाबत कार्यकर्त्यांना सूचना केल्यात.

याकार्यक्रमासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नगरसेवक श्री,भिकनुर पठाण, श्री राजूदादा देशमुख ,सौ , सुवर्णा पाटील श्री इसाक मलिक , तसेच शेतकी संघाचे संचालक शिवाजी राजाराम पाटील , नागराज पाटील , भीमराव पाटील, राजू आबा पाटील , संजय भास्कर पाटील , डॉ. सुनील पाटील , प्रा. हरीश पाटील सर, उपसरपंच विनोद पाटील व राष्ट्रवादीग्रंथालय विभागाचे सर्व पदाधिकारी व सर्व युवक कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. आयोजक भैय्यासाहेब पाटील यांनी सर्व रक्तदाते व सर्व मान्यवर तसेच ब्लड बँकचे डॉक्टर, नर्स व इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

- Advertisement -