newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची कुऱ्हाड गावात दबंग कारवाई. महिलावर्गातून अभिनंदन.

- Advertisement -

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लोहारा दुरक्षेत्राचे कार्यकक्षेत येणाऱ्या कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक गावात देशीदारुसह गावठीदारुची निर्मिती व विक्री भरवस्तीत व वर्दळीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या सुरु होती.

- Advertisement -

येथील दारु निर्मिती व विक्रीचे प्रमाण इतके आहे की या गावातून आसपासच्या जवळपास दहा खेड्यात दारुचा पुरवठा करण्यात येत होता तर कुऱ्हाड येथे जवळपासच्या पाच खेड्यावरील तळीराम दारु पिण्यासाठी येत असल्याने गावात सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा उडून गावपरिसरात अशांतता पसरली होती.

याची तक्रार कुऱ्हाड येथील काही सुज्ञनागरीकांनी व महिलांनी तक्रार केली होती याची दखल घेत गावक-यांनी जळगाव येथील कर्तव्यदक्ष अधिकारी मा.श्री. चंद्रकांतजी गवळी साहेब यांना वस्तुस्थिती सांगितली होती. बातम्यांची व तक्रारीची दखल घेत पाचोरा डी.वाय.एस.पी मा.श्री. भरतजी काकडे यांच्या आदेशानुसार पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. निताजी कायटे यांनी दिनांक १४ एप्रिल बुधवाररोजी पो.हे.कॉ. रणजित पाटील , पो.हे.कॉ. निवृत्ती मोरे, पो.कॉ. अरुणभाऊ राजपूत , संदिप राजपूत व सहकारी यांच्यासह अवैधधंदे करणाराकडे धाडसत्र राबवून कारवाई केल्याचे व बिनामास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात आली .

( पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी धडक कारवाई केल्याने अवैधधंदे करणारांचे धाबे दणाणले असून या कारवाई बाबत कुऱ्हाड ग्रामस्थ व महिलांनी आभार मानले असून कारवाईत सातत्य ठेवून दारू, सट्टा, जुगार कायमस्वरूपी बंद करावे अशी आपेक्षा व्यक्त केली आहे. )

- Advertisement -